माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात गूळ सौदे बंद

येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ बाजारात माथाडी कामगारांनी मजुरीमध्ये वाढ करावी, या मादणीसाठी शुक्रवारी (ता. ३०)अचानक काम बंद आंदोलन केले. त्यामुळे यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच गूळ सौदे बंद पडले. जवळपास दीड तास चर्चा झाल्यानंतर सात टक्के मजुरी वाढ देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर गूळ सौदे पूर्ववत सुरू झाले.
Jaggery deals closed in Kolhapur over Mathadi workers' dispute
Jaggery deals closed in Kolhapur over Mathadi workers' dispute

कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ बाजारात माथाडी कामगारांनी मजुरीमध्ये वाढ करावी, या मादणीसाठी शुक्रवारी (ता. ३०)अचानक काम बंद आंदोलन केले. त्यामुळे यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच गूळ सौदे बंद पडले. जवळपास दीड तास चर्चा झाल्यानंतर सात टक्के मजुरी वाढ देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर गूळ सौदे पूर्ववत सुरू झाले.

यंदाच्या गूळ हंगामाला नुकतीच सुरुवात झाली असून बाजारपेठेत कोल्हापुरच्या ग्रामीण भागातून गूळ रवे विक्रीसाठी येऊ लागले आहेत. जवळपास पन्नास हजारांहून अधिक गूळ रव्यांची आवक सध्या बाजारपेठेत होत आहे. अशा स्थितीत माथाडी कामगारांनी आम्हाला २० टक्के मजुरी वाढ द्यावी, असा आग्रह खरेदीदार यांच्याकडे काल केला होता. त्याला खरेदीदारांनी ही नकार दिला होता.  

सकाळी शाहू मार्केट यार्डातील गूळ बाजारात सौदे सुरू झाले. त्याचवेळी माथाडी कामगारांनी आम्हाला मजुरीवर द्यावी, या मागणीसाठी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी होणारे बहुतेक माथाडी कामगार हे खरेदीदार यांच्याकडे काम करणारे आहेत. सौदे झालेल्या गुळाचे पॅकिंग करणे, वजन करणे, गूळ रवे गाडीत भरणे अशी कामे हे माथाडी कामगार करतात. ३० किलो २० किलो दहा किलो व पाच किलो दोन किलो अशा वजनाच्या गूळ रव्यांची मजुरी दहा रुपये पन्नास रुपये पर्यंत आहे. यात वीस टक्के वाढ द्यावी, अशी मागणी मजुरांनी केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com