Agriculture News in Marathi The jaggery houses in Shirala are still closed | Page 3 ||| Agrowon

शिराळ्यातील गुऱ्हाळ घरांना घरघर 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021

शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळ घरे दसरा आणि दिवाळीनंतर सुरू होतात. महापूर आणि गुळाला अपेक्षित दर नाही तसेच मजुरांची टंचाई या अडचणींमुळे तालुक्यातील गुऱ्हाळ घरे अद्यापही सुरू झाली नाहीत. परिणामी, गुऱ्हाळ घरांना घरघर लागली असल्याचे चित्र आहे. 

सांगली ः शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळ घरे दसरा आणि दिवाळीनंतर सुरू होतात. महापूर आणि गुळाला अपेक्षित दर नाही तसेच मजुरांची टंचाई या अडचणींमुळे तालुक्यातील गुऱ्हाळ घरे अद्यापही सुरू झाली नाहीत. परिणामी, गुऱ्हाळ घरांना घरघर लागली असल्याचे चित्र आहे. 

शिराळा तालुका जसा भात उत्पादन पिकासाठी ओळखला जातो. तसा गूळ उत्पादनासाठी अशी एक वेगळी ओळख आहे. या तालुक्यातील कोकरूड, मणदूर, बिळाशी, सागाव, कणदूर मांगरूळ या गावांत गुऱ्हाळ घरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे येथील शेतकरी गूळनिर्मितीला प्राधान्य देतात. गूळ पाठविण्याच्या हमीवर शेतकरी पावसाळ्यातच बाजारपेठेतील अडत दुकानदारांकडून उचल घ्यायचे व पैशांच्या परतफेडीसाठी जवळच्या 
गुऱ्हाळ घरांत गूळ उत्पादन घेऊन तो गूळ बाजारपेठत पाठवायचे. गूळनिर्मितीतून गुऱ्हाळ मालक व शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्न मिळायचे, पण सध्या परिस्थिती बदलली आहे. 

महापुराचा मोठा फटका 
सन २०१९मध्ये या तालुक्यात महापुराचा फटका बसला होता. त्यावेळी गुऱ्हाळ घरमालकांनी त्याची दुरुस्ती करून पुन्हा नव्या जोमाने गुऱ्हाळ घरे उभारली होती. परंतु त्या वर्षी सुमारे १० गुऱ्हाळ घरे सुरू झाली. दरम्यानच्या काळात, मजुरांची टंचाई जाणवू लागली. त्यामुळे २०२०मध्ये 
अवघी पाच ते सहा गुऱ्हाळ घरे सुरू झाली. तरी देखील दर्जेदार गूळनिर्मिती करून विक्रीसाठी शेतकरी पुढे आले.

मात्र यंदा देखील महापुराचा फटका गुऱ्हाळ घरांना बसला आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यासाठी गुऱ्हाळ मालक पुढे आलेच नाहीत. जरी दुरुस्ती केली असती तरी मजुरांच्या टंचाईला सामोरे जावे लागले असते. अलीकडच्या काळात मजुरांकडून फसवणुकीचे प्रकार घडू लागले आहे. त्यामुळे पैसे अडकले की पैसे परत मिळत नाहीत. त्यातही उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. तालुक्यातील गुऱ्हाळ घरे दसरा, दिवाळीच्या दरम्यान सुरू होतात. मात्र यंदाच्या हंगामात तालुक्यातील गुऱ्हाळ घरे सुरू झाली नाहीत. त्यामुळे शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळ घरांना उतरती कळा लागली आहे. 

प्रतिक्रिया 
दोन वर्षे महापूरचा फटका बसल्याने पुन्हा नव्याने गुऱ्हाळ घरांची दुरुस्ती करणे आता कठीण बनले आहे. मजुरांची टंचाई आणि गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने फार बिकट परिस्थिती निर्माण झाली आहेत. 
-संजय नांगरे, गुऱ्हाळ घरमालक, कोकरूड, ता. शिराळा


इतर अॅग्रो विशेष
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...