agriculture news in marathi, jaggery industry must be given economical support : Pasha Patel | Agrowon

गूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे आवश्यक : पाशा पटेल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 जानेवारी 2019

मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच हमीभावाच्या माध्यमातून गूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी गूळ मंडळ बोर्ड स्थापन करण्यासोबतच गुऱ्हाळघरांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा, अनुदान, जीआय मानांकनाची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी स्पष्ट केले. 

मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच हमीभावाच्या माध्यमातून गूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी गूळ मंडळ बोर्ड स्थापन करण्यासोबतच गुऱ्हाळघरांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा, अनुदान, जीआय मानांकनाची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी स्पष्ट केले. 

गूळ हमीभाव आणि काजू बोंडांवर प्रक्रिया या विषयाच्या अनुषंगाने पाशा पटेल यांनी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांची मंगळवारी (ता.२२)  मंत्रालयात भेट घेतली. काजू रसाचा समावेश वाईनमध्ये करु नये, अशी मागणीही यावेळी कृषिमंत्री पाटील यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर पाशा पटेल म्हणाले, की गूळ हमीभाव उपसमितीचा अहवाल नुकताच राज्य शासनाला सादर झाला. उपसमितीने या अहवालात प्रामुख्याने गुळाची व्याख्या नव्याने करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी गुळाच्या व्याख्येत गूळ तयार करण्याच्या पद्धतीचा (ओपन पॅन, क्लोज्ड पॅन) समावेश असावा.

आरोग्यवर्धक तसेच खाण्यास योग्य या शब्दांचा समावेश असावा आणि गुळातील घटकांचा उल्लेख बीआयएस मानांकनाप्रमाणे असावा या सूचना समितीने केलेल्या आहेत. त्यासोबतच समितीने या अहवालात गूळ व्यवसायातील अडचणी आणि समस्यांकडेही लक्ष वेधले आहे. या व्यवसायात कुशल, अकुशल मजुरांची कमतरता आहे. दिवसेंदिवस धंद्यात उत्पादन आणि भांडवली खर्च वाढत आहे. उत्पादीत गुळाच्या दर्जात सातत्य राहत नाही, ही एक समस्या आहे. रासायनिक व सेंद्रीय खतांची अनुपलब्धता तसेच वाढलेल्या किंमती, व्यवसायात आधुनिकतेचा अभाव (प्रक्रिया, उत्पादन, विक्री आणि व्यवस्थापन), रस शुद्धीकरणासाठी रसायनांचा अशास्त्रीय आणि अतिरेकी वापर चिंताजनक आहे.

गुळाला वाजवी दर मिळत नाही तसेच दरातील तफावत कमी करावी. उद्योगाला अखंडीत वीज पुरवठा मिळावा आणि वीज दराची आकारणी शेतीच्या दराप्रमाणे करावी. साठवणुकीसाठी अद्ययावत साधनसामुग्री आणि सुविधांचा अभाव, गूळ मंडळ बोर्ड स्थापन करणे, उद्योगाला कमी व्याजाने कर्ज पुरवठा करणे, गुऱ्हाळघर उभारणी तसेच गूळ प्रक्रिया खर्चासाठी अनुदान देणे, गूळ तारण कर्ज सुविधा उपलब्ध करुन देणे, जीआय मानांकनाची अंमलबजावणी करणे, गूळ निर्यात आदी बाबींकडे समितीने अहवालाद्वारे शासनाचे लक्ष वेधले असल्याचे कृषीमूल्य आयोगाच्या पाशा पटेल यांनी स्पष्ट केले. गुळाला हमीभाव मागणीच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. ए. एम. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची स्थापना करण्यात आली होती. समितीने स्वतःचा अहवाल राज्य कृषीमूल्य आयोगाकडे सादर केला आहे.

इतर अॅग्रो विशेष
राज्य बॅंकेच्या दारात जिल्हा बॅंकांचे...सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह...
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य...
पूर संकटाचा नव्याने अभ्यास पुणे  : कृष्णा व भीमा खोऱ्यात यंदा आलेल्या...
शेतजमीन मोजणीचा गोंधळ सुरूचपुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे...
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराने शेतकरी...नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी...
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
कृषिसेवक भरती प्रक्रियेवरील बंदी...अकोला ः कृषी खात्याने १४१६ जागांसाठी राबवलेल्या...
यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची...पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या...
पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४...मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...पुणे  : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या...
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...