कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार वाढला

गुऱ्हाळ
गुऱ्हाळ

सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने थेट गुऱ्हाळ घरावरून व्यापार वाढला आहे. त्याचा परिणाम सांगलीतील बाजारपेठेवर होऊ लागला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार महिन्यांत ११ हजार ५२५ क्विंटलने आवक कमी होऊन जुलै २०१९ मध्ये आवकेवर मोठा परिणाम झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारे बेदाणा, हळद आणि गुळाचे सौदे देशभर प्रसिद्ध आहेत. येथील बाजार समितीत कर्नाटक राज्यातून गुळाची आवक मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे दराची स्पर्धा होऊन दर चांगले मिळतात. याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. मात्र, कर्नाटकात गेल्यावर्षी कमी झालेला पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे उसाच्या क्षेत्रात घट झाली. यामुळे गूळ उत्पादन करणाऱ्या पट्ट्यातून गुळाची मागणी वाढली आहे. त्यामुळे येथील अनेक व्यापारी थेट कर्नाटकात गूळ खरेदी करण्यासाठी जाऊ लागले आहेत. कर्नाटकातून थेट गूळ खरेदी होत असल्याने सांगलीची गूळ बाजारपेठ ही ओळख काहिशी कमी होत आहे. थेट गुऱ्हाळावरुन गूळ खरेदी वाढल्याने मध्यंतरी सांगली बाजार समितीत खरेदीदार व्यापारी आणि हमाल आमनेसामने आले. हमाली बहिष्कारला सौदे बहिष्कारने प्रत्युत्तर दिले. दरम्यान समन्वयाने ही दोन्ही आंदोलन थांबली. अडत ३ टक्क्यांऐवजी २ टक्के, बाजर सेसमध्ये क्विंटटला दहा पैसे कमी करणे व काही बाबींसदर्भातील हमाली कमी करून सांगली बाजार समितीतल खरेदीदार व्यापाऱ्यांचा खर्च कमी केला तर गुळाची आवक पूर्ववत सुरू होईल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्यानुसार बैठकही घेण्याचे ठरले परंतु, या बैठकीला अद्यापही मुहूर्त लागला नाही.  कर्नाटकात अडत, हमाली कमी अडतीची चुकवेगिरी करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून गुळाचे व्यापारी आणि अडते थेट कर्नाटकातील काही बाजारपेठा आणि गुऱ्हाळगृहातून गूळ उचलत आहेत. कर्नाटातील काही बाजारपेठेत अडत एका टक्‍क्‍यांनी कमी आहे, तसेच हमाली देखील कमी आहे. त्यामुळे काही व्यापारी तेथून गूळ उचलण्याचा उद्योग करीत आहे. सांगली बाजार समितीतील गुळाची आवक (क्विंटल)

महिना २०१८ २०१९
मार्च ८४१४६ ८०६६५
एप्रिल ८५५०५ ८६७९०
मे १०७८२२ ९४३०४
जून ७४६३६ ८७७२५
एकूण ३५२१०९ ३४०५८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com