Agriculture news in marathi jaggry rate down due to slows down demand from Gujarat | Agrowon

गुजरातमधून मागणी मंदावल्याने गूळ दरांत पडझड

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

अगोदर हंगाम उशिरा सुरू झाला. त्यात दर घसरणीने दणका देण्यास सुरुवात केली. आता गूळ तयार करावा की नको, याचा विचार करावा लागत आहे. 
- शिवाजी पाटील, गूळ उत्पादक 

यंदाचा हंगाम गूळ उत्पादकांबरोबर व्यापाऱ्यांचीही परीक्षा पाहणारा ठरला आहे. अपेक्षित मागणी नसणे, गुळाच्या दर्जाची अडचण आदी कारणांमुळे आम्हाला जादा प्रमाणात गूळ खरेदी करणे अशक्‍य बनत आहे. उत्पादकांना दर मिळायलाच पाहिजे. पण, सध्याची परिस्थिती प्रतिकूल आहे. कारखाने सुरू झाल्यानंतर नक्कीच दर वाढतील असे वाटते. 
- निमेश वेद, गूळ व्यापारी, कोल्हापूर.

कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुजरातला गुळाची मागणी मंदावली आहे. याचा परिणाम गूळ उद्योगावर होत आहे. महापुरामुळे उसाचे नुकसान झाल्याने गुळाचा दर्जाही बिघडत आहे. परिणामी, गुळाच्या दरात गेल्या आठवड्यात क्विंटलला तब्बल ५०० रुपयांची घसरण झाली. गेल्या हंगामाच्या तुलनेत येथील बाजार समितीत तब्बल दीड लाख गूळ रव्यांची आवक घटली आहे. महापूर व अतिवृष्टीमुळे यंदा उसाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदा गुळाचे उत्पादन कमी होऊन दर वाढतील, ही अपेक्षा फोल ठरली आहे.

यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त पंचवीस टक्के गुऱ्हाळे सुरू झाली आहेत. परंतु, ऊस खराब असल्याने त्यातून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने उत्पादक हैराण आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस पूर्णपणे थांबल्याने गुऱ्हाळघरांना गती येताना दिसते. पण, खराब ऊस असल्याने दर्जा राखताना कसरती होत आहेत. दर्जावरही परिणाम होत आहे. 

गुजरातच्या बाजारात कोल्हापूरच्या गुळाला खास मागणी आहे. पण, यंदा ऊस उत्पादन कमी असल्याने तेथील व्यापाऱ्यांनी सांगलीसह कर्नाटकातूनही गुळाची मागणी नोंदविली. कोल्हापूरपेक्षा या बाजारपेठांत हमाली कमी असल्याने गूळ वाहतूक स्वस्त आहे. व्यापाऱ्यांनी या भागातून गूळ खरेदीला प्राधान्य दिले. याचा परिणाम ही जिल्ह्यातील गुळावर झाला असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. यंदा दररोज १५ हजार गूळ रव्यांची आवक दररोज होत आहे. याच कालावधीत गेल्या वर्षी २५ ते ३० हजार गूळ रव्यापर्यंत आवक होत होती. 

येथील व्यापारीही गूळ शीतगृहासाठी पाठविण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याची स्थिती आहे. यामुळे जादा गूळ खरेदी करून ठेवायचा कोठे, हा प्रश्‍न आहे. पंधरवड्यापूर्वी गुळाचा दर क्विंटलला ३८०० ते ४५०० रुपये होता. या सप्ताहात तो सरासरी ५०० रुपयांनी घसरून ३३०० ते ४१०० रुपयांवर आला. 

कारखाने सुरू झाल्यावर दरवाढीची शक्‍यता

गुळाला दर नसल्याने शेतकरी गुळाऐवजी कारखान्याला ऊस पाठविण्याची शक्‍यता आहे. असे झाले आणि बाजार समितीत गुळाची अगदीच चणचण भासू लागली, तर मात्र गुळाचे दर पुन्हा वाढतील, असा अंदाज आहे. पण सध्या तरी गूळ उत्पादकांना तोटाच सहन करावा लागत आहे. 


इतर अॅग्रोमनी
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...