कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलन

केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन कायद्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. ३) रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण, भजन, कीर्तन आणि पिठलं भाकरी खाऊन आंदोलन करण्यात आले.
Jagran Andolan against agricultural laws
Jagran Andolan against agricultural laws

पुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन कायद्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. ३) रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण, भजन, कीर्तन आणि पिठलं भाकरी खाऊन आंदोलन करण्यात आले.

कृषी आणि पणन कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या चार, पाच दिवसांपासून पंजाब आणि हरियाना राज्यांतील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी रात्री आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमोल हिपरगी, बापू कारंडे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com