नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
बातम्या
रयत क्रांती संघटनेतर्फे जागरण गोंधळ आंदोलन
रयत क्रांती संघटनेतर्फे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. कानगाव (ता. दौंड) येथे शेतकरी सयाजी मोरे यांच्या नुकसान झालेल्या शेतामध्येच जागरण हे आंदोलन करून राज्य शासनाला साकडे घालण्यात आले आहे.
पुणे ः रयत क्रांती संघटनेतर्फे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. कानगाव (ता. दौंड) येथे शेतकरी सयाजी मोरे यांच्या नुकसान झालेल्या शेतामध्येच जागरण हे आंदोलन करून राज्य शासनाला साकडे घालण्यात आले आहे.
जागरण गोंधळाच्या आंदोलनामध्ये रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा अनिता ताकवणे, कानगाव शाखाप्रमुख राजेंद्र फडके, शेतकरी लक्ष्मण फडके, गणपत नलवडे, प्रकाश ताकवणे, नर्मदा शिंदे व योगिता शिंदे, द्रोपदाबाई कोऱ्हाळे, विमल मोरे यांच्यासह महिला शेतकरी सामील झाल्या होत्या.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्यभर जागरण गोंधळाचे आंदोलन पुकारले होते. त्याचाच एक भाग म्हणून कानगाव या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतामध्येच जागरण गोंधळाचे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसंदर्भात रयत क्रांती संघटनेतर्फे शासनाकडे मागण्या मांडण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी दिली.