अकोल्यात किसान सभेतर्फे ‘जेल भरो` आंदोलन

अकोल्यात किसान सभेतर्फे ‘जेल भरो` आंदोलन
अकोल्यात किसान सभेतर्फे ‘जेल भरो` आंदोलन

नगर : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अकोल्यात किसान सभेतर्फे  ‘जेल भरो` सत्याग्रह करण्यात आला. दरम्यान, अखिल भारतीय स्तरावर सभेतर्फे दहा कोटी सह्या संकलित करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. महाराष्ट्रात वीस लाख सह्या संकलित करून राज्यभरातील तहसील कार्यालयांमार्फत प्रधानमंत्र्यांना पाठविण्यात येत असून, जिल्ह्याच्या वतीने २५ हजार चारशे सह्या या वेळी अकोले तहसीलदारांना सादर करण्यात आल्या.

सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, शेतीमालाला स्वामिनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे उत्पादक खर्चाच्या दीडपट हमी भाव द्या, वन जमिनींचे नवे दावे स्वीकारा, वन जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा, पीक पाहणीचे अर्ज स्वीकारून त्याची पोहोच द्या, गावोगाव लाभार्थी नोंदणीची मोहीम घेऊन सर्व पात्र लाभार्थींना मानधन सुरू करा, अन्नसुरक्षेच्या यादीत नवीन लाभार्थ्यांचा समावेश करा आदी मागण्या करणारे निवेदन या वेळी सादर करण्यात आले.

नाशिक ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात आला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या सन २०१७ पर्यंतच्या कर्जाचा कर्जमाफीत समावेश करण्याबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अजूनही कर्जमाफीत २०१७ च्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. वन जमिनी नावे करण्यातही अक्षम्य दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे ‘जेल भरो`द्वारे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com