मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त
बातम्या
जैन इरिगेशनला जलसंसाधनासाठी ‘सीबीआयपी’ पुरस्कार
जळगाव / नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन ॲण्ड पॉवर (सीबीआयपी) या संस्थेतर्फे दरवर्षी विविध संस्था, भागधारक आणि व्यावसायिकांना पाणी, ऊर्जा आणि पुनर्निमित ऊर्जा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी १९२७ पासून पुरस्कार दिले जातात. यावर्षी जलसंसाधनांच्या कार्यक्षम वापराबद्दल जैन इरिगेशनला सीबीआयपीतर्फे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार कंपनीचे वरिष्ठ सहकारी वरुणकुमार सिंग यांनी स्वीकारला.

नवी दिल्ली येथील लोधी रोडवरील स्कोप कन्व्हेन्शन सेंटरच्या स्कोप कॉम्प्लेक्समध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जलसंसाधन व मानव संसाधन विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग, जलसंसाधन लोकसभा कामकाज आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ऊर्जा, कायदा आणि कायदा कामकाज केंद्रीय राज्यमंत्री पुष्पेंद्र सिंग उपस्थित होते.
भारतातील ठिबक आणि तुषार सिंचन प्रणालीच्या संशोधनातील नावीन्य पूर्णतेसाठी आणि अग्रगण्य अशी कंपनीचे नैसर्गिक संसाधनांच्या कार्यक्षम वापरासाठी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ घडविल्याबद्दल जैन इरिगेशनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘सीबीआयपी दिन’ दरवर्षी जानेवारीमध्ये दिल्ली येथे साजरा केला जातो. यानिमित्त सीबीआयपी पुरस्काराचे वितरण करते. उपस्थितीत मान्यवरांनी सिंचन, जलसंसाधनाचे जतन आणि पाणी वापराची कार्यक्षमता याविषयांवर विचारमंथन केले. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना सूक्ष्मसिंचनाचे महत्त्व सांगितले.
- 1 of 921
- ››