राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्षपदी दांडेगावकर

राज्य सहकारी साखर कारखाना फेडेरेशनचे विद्यमान अध्यक्ष जयप्रकाश साळुंके - दांडेगावकर यांची शुक्रवारी (ता.१८) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्षपदी दांडेगावकर
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्षपदी दांडेगावकर

कोल्हापूर : राज्य सहकारी साखर कारखाना फेडेरेशनचे विद्यमान अध्यक्ष जयप्रकाश साळुंके - दांडेगावकर यांची शुक्रवारी (ता.१८) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. नवी दिल्ली येथे महासंघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली. श्री. दांडेगावकर यांच्यापूर्वी दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष होते. परंतु त्यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश झाल्याने त्यांनी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे ही निवड झाली. दांडेगावकर हे सहकारी साखर कारखाना क्षेत्राशी दीर्घ काळापासून संबंधित आहेत. हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्षही आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे वरिष्ठ संचालक म्हणून काम करताना त्यांनी साखर कारखाना क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी जोरदार पाठपुरावा केला आहे. या वेळी महासंघाचे उपाध्यक्ष केतनभाई पटेल, महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. ‘गुणवत्ता वाढ, चोख कारभारासाठी प्रयत्न’ ‘‘शेतकरी व साखर कारखान्यांच्या समस्या, रास्त दर, उसाची थकबाकी, उसाला देण्यात येणारी किमान आधारभूत किंमत, कारखान्यांना मिळणारा वित्तीय पुरवठा, त्यातील व्यावहारिक अडचणी, साखरेची निर्यात याबाबतच्या प्रश्‍नांचा केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करू. सहकारी साखर कारखान्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांचा आर्थिक व वाणिज्यविषयक कारभार अधिक चोख व्हावा यासाठी आपण संचालक मंडळाच्या साह्याने प्रयत्न करू,’’अशी ग्वाही जयप्रकाश दांडेगावकर यांनी निवडीनंतर दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com