agriculture news in marathi Jaiprakash Dandegaokar now to chair National co_operative sugar Factory association, New Delhi | Page 2 ||| Agrowon

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्षपदी दांडेगावकर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 डिसेंबर 2020

राज्य सहकारी साखर कारखाना फेडेरेशनचे विद्यमान अध्यक्ष जयप्रकाश साळुंके - दांडेगावकर यांची शुक्रवारी (ता.१८) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

कोल्हापूर : राज्य सहकारी साखर कारखाना फेडेरेशनचे विद्यमान अध्यक्ष जयप्रकाश साळुंके - दांडेगावकर यांची शुक्रवारी (ता.१८) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. नवी दिल्ली येथे महासंघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली.

श्री. दांडेगावकर यांच्यापूर्वी दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष होते. परंतु त्यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश झाल्याने त्यांनी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे ही निवड झाली.
दांडेगावकर हे सहकारी साखर कारखाना क्षेत्राशी दीर्घ काळापासून संबंधित आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्षही आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे वरिष्ठ संचालक म्हणून काम करताना त्यांनी साखर कारखाना क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी जोरदार पाठपुरावा केला आहे. या वेळी महासंघाचे उपाध्यक्ष केतनभाई पटेल, महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

‘गुणवत्ता वाढ, चोख कारभारासाठी प्रयत्न’
‘‘शेतकरी व साखर कारखान्यांच्या समस्या, रास्त दर, उसाची थकबाकी, उसाला देण्यात येणारी किमान आधारभूत किंमत, कारखान्यांना मिळणारा वित्तीय पुरवठा, त्यातील व्यावहारिक अडचणी, साखरेची निर्यात याबाबतच्या प्रश्‍नांचा केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करू. सहकारी साखर कारखान्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांचा आर्थिक व वाणिज्यविषयक कारभार अधिक चोख व्हावा यासाठी आपण संचालक मंडळाच्या साह्याने प्रयत्न करू,’’अशी ग्वाही जयप्रकाश दांडेगावकर यांनी निवडीनंतर दिली.


इतर अॅग्रोमनी
अर्जेंटिनात महागाई भडकलीब्युनॉस आयर्स ः अर्जेंटिनात शेतीमालाचे दर...
तुरीने खुल्या बाजारात ओलांडला हमीभावाचा...नगर : तुरीचे शासनाकडून हमी दराने खरेदी केली जात...
सोयाबीन पाच हजारांवरपुणे ः उत्पादनात घट, वाढलेली मागणी आणि चांगली...
तूर टप्प्‍याटप्प्याने विकण्याचे आवाहन पुणे ः देशात यंदा तूर उत्पादनात ३० टक्‍...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात...कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ...
शेतजमीन भाडेपट्ट्यावर देण्यासाठी...नवी दिल्ली ः शेतजमिनी भाडेपट्ट्यावर देण्यासाठी...
‘व्हेजनेट’वर होणार ४३ पिकांची नोंदणी नागपूर ः निर्यातीसह देशांतर्गत ग्राहकांना...
शेती, संलग्न क्षेत्रांच्या निधीत कपात पुणे ः केंद्रीय अर्थसंकल्पात यंदा शेती आणि संलग्न...
बियाणे उद्योगाला जीएसटी परताव्याची...पुणे : अंतिम उत्पादनावर जीएसटी नसला तरी...
साखर विक्रीचा दबाव कायम कोल्हापूर : साखर विक्रीच्या दबावाखाली आलेल्या...
कृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट यंदा वाढणारनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत...
साखरेच्या निर्यात योजनेत लवचिकताकोल्हापूर : यंदा साखर जास्तीत जास्त निर्यात...
छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदीरायपूर : : छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान...
अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सोयाबीन... पुणे ः प्रतिकूल हवामानामुळे  ...
देशातील साखर उत्पादन ‘सुसाट’; १४२ लाख...कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाने...
आधारभावाअभावी मक्याची परवडचालू हंगामासाठी केंद्र सरकारने मक्याला १८५० रुपये...
अमेरिकेत सोयाबीन उत्पादनात घटवॉशिंग्टन ः अमेरिकेत यंदा सोयाबीन उत्पादनात घटीचा...
जागतिक मका उत्पादनात घट वॉशिंग्टन ः जागतिक मका उत्पादनात घट होणार...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...