'जैश 'ला रोखण्यासाठी बालाकोटवर हल्ला : भारत

जैशला रोखण्यासाठी बालाकोटवर हवाई हल्ला : भारत
जैशला रोखण्यासाठी बालाकोटवर हवाई हल्ला : भारत

नवी दिल्ली : जैश-ए-मोहमंद ही दहशतवादी संघटना गेल्या दोन दशकांपासून भारताविरोधात कारवाया करत आहे. जैश-ए-मोहमंदला रोखण्यासाठी भारताने पाक व्याप्त काश्मिरमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केल्याची अधिकृत माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी आज (ता. २६) येथे दिली. 

आज पहाटे ३.३० वाजता भारतीय वायुसेनेने पाक व्याप्त काश्मिरमधील जैश-ए-मोहमंद या दहशतवादी संघटनेच्या बालोकोट येथील कॅम्पला लक्ष्य केले. यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या अधिकृत घोषणे कडे लागले होते. या पाश्वर्भूमीवर भारतीय  परराष्ट्र सचिव श्री. गोखले यांनी हल्ल्या मागील भारताची भूमिका स्पष्ट केली. 

सचिव श्री. गोखले म्हणाले, की १४ फेब्रुवारी २०१९ ला पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहंमदने एक आत्मघाती हल्ला भारतीय सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर केला होता. यात भारताचे ४० शूर सैनिक हुतात्मा झाले होते. गेल्या दोन दशकांपासून जैश-ए-मोहंमद पाकिस्तानमध्ये कार्यरत आहे. बहावलपूर येथे या संघटनेचे मुख्यालय असून अझर मसूद हा तिचा म्होरक्या आहे. 

या संघटनेला संयुक्त राष्ट्र संघटनेने अनधिकृत म्हणून घोषित केले आहे. डिसेंबर२००१ मधील भारतीय संसदेवरील हल्ला, जानेवारी २०१६ पठाणकोट हवाईतळावरील हल्ला अशा सर्व  दहशतवादी हल्ले या संघटनेने सातत्याने भारतावर केले आहेत. 

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील जैश-ए-मोहंमदच्या प्रशिक्षण शिबिरांच्या स्थळांची  माहिती वेळोवेळी पाकिस्तान सरकारला वेळोवेळी  कळविण्यात आली. पाकिस्तानी हस्तक्षेपाशिवाय या शेकडो जिहादी  दहशतवाद्यांना देण्यात येणारे अत्याधुनिक प्रशिक्षण आणि सोयीसुविधा मिळणे शक्य नव्हते. 

भारताने सातत्याने जैश-ए-मोहंमद पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना देत असलेल्या प्रशिक्षण रोखण्यासाठी  प्रत्यक्ष कारवाई करण्याची मागणी करत आला आहे. मात्र, पाकिस्तानने आपल्या भूमीवरून  होत असलेल्या या कारवाया रोखण्यासाठी कोणतीही ठोस भूमिका कधी घेतली नाही. 

जैश-ए-मोहंमद पुन्हा एकदा भारतातील विविध ठिकाणी  आत्मघाती दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय माहिती भारताला मिळाली होती आणि याकरिता फिदायीन दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले होते. संभाव्य धोका ओळखून तत्काळ  हवाई हल्ला करण्याची नितांत गरज होती. 

भारतीय गुप्तचर विभागाच्या नेतृत्वाखाली काही तासांपूर्वी  झालेल्या हल्ल्यात, भारताने जैश-ए-मोहंमदच्या बालाकोट येथील सर्वांत मोठ्या प्रशिक्षण तळावर हल्ला केला. या कारवाईत जैश-ए-मोहंमदचे अतिरेकी, प्रशिक्षक, वरिष्ठ कमांडर आणि फिदायीन कारवाईसाठी प्रशिक्षित  जिहादीं मोठ्या प्रमाणात मारले गेले. बालाकोट येथील हा कॅम्प जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या अझर मसूदचा मेव्हणा मौलाना युसूफ अझर (उर्फ उत्साद घौरी) हा चालवत होता. 

देशाविरुद्ध होत असलेल्या  दहशवादी कारवाया रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यास भारत सरकार ठाम आणि वचनबद्ध आहे. तसेच, भारताने केलेली ही अलष्करी कारवाई केवळ जैश-ए-मोहंमद या कॅम्पपुर्ती  सिमित होती. कोणतीही नागरी नुकसान होणार नाही, अशी काळजी घेण्यात आली होती. हल्ल्याचे ठिकाण हे नागरी वस्त्यांपासून दूर अत्यंत घनदाट जंगलात एका डोंगरमाथ्यावर होते. हल्ल्यांची आणखी माहिती मिळणे बाकी आहे. 

'पाकिस्तान सरकारने जानेवारी २००४ मध्ये आपल्या भूमीचा भारताविरद्धच्या  दहशतवादी कारवायांसाठी वापर होऊ देणार नाही असे अधिकृत सांगितले होते. पाकिस्तानने सार्वजनिकरीत्या दिलेल्या या शब्दाप्रमाणे  जैशचा बंदोबस्त करावा,इतर ठिकाणचे कॅम्पवर कारवाई करावी आणि दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्यांसाठी शिक्षा करावी, अशी आशा आम्ही करतो,' असे भारताने म्हटले आहे.      

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com