agriculture news in Marathi, jalgao in green chilly rate up | Agrowon

जळगावात गवार, हिरवी मिरची तेजीत
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 16 एप्रिल 2019

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात गिलके व कारल्यांची आवक नगण्यच राहिली. गिलक्‍यांची प्रतिदिन एक क्विंटल तर कारल्यांचीदेखील प्रतिदिन सव्वा क्विंटलपर्यंतची आवक झाली. गिलक्‍यांना प्रतिक्विंटल ६५०० तर कारल्यांना प्रतिक्विंटल ५५०० रुपये दर मिळाला. 

कारल्यांसह गिलके हे वेलवर्गीय पीक आहे. जेथे बऱ्यापैकी पाणी आहे, त्याच भागात लागवड झाली आहे. लागवड यावल, चोपडा, जामनेर, पाचोरा भागांत झाली आहे. आवक मात्र महिनाभरापासून कमीच आहे. गिलक्‍यांचे दर मागील पंधरवड्यापासून ६५०० रुपये प्रतिक्विंटल, असेच आहेत. कारल्यांची आवक मागील आठ ते दहा दिवसांत वाढली. 

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात गिलके व कारल्यांची आवक नगण्यच राहिली. गिलक्‍यांची प्रतिदिन एक क्विंटल तर कारल्यांचीदेखील प्रतिदिन सव्वा क्विंटलपर्यंतची आवक झाली. गिलक्‍यांना प्रतिक्विंटल ६५०० तर कारल्यांना प्रतिक्विंटल ५५०० रुपये दर मिळाला. 

कारल्यांसह गिलके हे वेलवर्गीय पीक आहे. जेथे बऱ्यापैकी पाणी आहे, त्याच भागात लागवड झाली आहे. लागवड यावल, चोपडा, जामनेर, पाचोरा भागांत झाली आहे. आवक मात्र महिनाभरापासून कमीच आहे. गिलक्‍यांचे दर मागील पंधरवड्यापासून ६५०० रुपये प्रतिक्विंटल, असेच आहेत. कारल्यांची आवक मागील आठ ते दहा दिवसांत वाढली. 

कारल्यांची आवक मागील पंधरवड्यात प्रतिदिन ८० ते ९० किलोच राहिली. आवक कमी असल्याने एकच दर जाहीर होत आहे. लिलाव सकाळीच उरकले जातात. दोन-तीन अडतदारांकडे आवक होत आहे. गिलक्‍यांची आवक पुढेही फारशी वाढणार नाही, असे संकेत आहेत. 

गिलक्‍यांसह गवारचे दरही टिकून असून, आवक प्रतिदिन एक क्विंटल, अशी राहिली. दर ७००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. कूस असलेल्या गवारीची आवक अधिक होत आहे. तिला उठावही चांगला आहे. आवक जामनेर, यावल, जळगाव, पाचोरा भागांतून होत आहे. 

हिरव्या मिरचीची आवक मागील आठवड्यात प्रतिदिन नऊ क्विंटल राहिली. आवक कमी आहे. लहान, बारीक आकाराच्या तिखट मिरचीची फक्त तीन ते चार क्विंटल आवक होते. ही मिरची काही अडतदार आंध्र प्रदेशातून मागवून घेत आहेत. या मिरचीला एकच दर मिळत असून, किमान ४० रुपये प्रतिकिलोचा दर या अडतदारांना द्यावा लागत आहे. मोठ्या आकाराची कमी तिखट मिरचीदेखील येत आहे. 

परंतु, आवक कमी असतानाच उठाव बऱ्यापैकी असल्याने या मिरचीला किमान २५०० व कमाल ४००० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. जामनेर, यावल व नंदुरबारमधील मोठ्या पुरवठादारांकडून आवक होत आहे. भेंडीचे दरही टिकून आहेत. आवक मागील आठवड्यात सरासरी सहा क्विंटल प्रतिदिन अशी होती. दर २५ ते ४४ रुपये प्रतिकिलो असा मिळाला.

केळी दरात सुधारणा
रावेरसह जळगाव भागात नवती केळीच्या दरात क्विंटलमागे १०० रुपयांनी सुधारणा झाली आहे. रावेरात ९०० रुपये प्रतिक्विंटलचे दर सात-आठ दिवसांपूर्वी होते. त्यात सुधारणा होऊन ते १०२० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. तर जळगावातील नवती केळीचे दर ९८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. रावेरात पिलबाग मधूनदेखील केळीची आवक सुरू झाली असून, पिलबागमधील केळीला प्रतिक्विंटल ९२० रुपये दर मिळत आहे. कमी दर्जाच्या, उष्णतेमुळे दर्जा घसरलेल्या वापसी प्रकारच्या केळीला रावेरात ५६० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत असल्याची माहिती मिळाली.

इतर बाजारभाव बातम्या
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर २५०० ते ३५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सांगलीच्या बाजारपेठेत गुळाला ५५०० रुपये...सांगली : महापुरामुळे तसेच बरेच रस्ते...
नाशिकमध्ये कांदा प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
जळगाव बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
पुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे...पुणे ः आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून पडणाऱ्या...
औरंगाबादेत भेंडी १००० ते ४००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गवार प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल ४५०० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल सरासरी ५६००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगावात टोमॅटो, गवारीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व...
सोलापुरात वांगी, घेवडा, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा वगळता शेतीमालाची आवक जेमतेमनागपूर ः हरभऱ्याच्या सरासरी एक हजार क्‍विंटलच्या...
पुण्यात कांदा, आले, बीटच्या दरात सुधारणापुणे ः खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात...
औरंगाबादेत हिरवी मिरची २००० ते २८००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत कारले प्रतिक्विंटल १५०० ते २०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...