Agriculture news in Marathi, jalgao market in tomato rate stable | Agrowon

जळगावात टोमॅटो, गवारीचे दर टिकून
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व गवारची आवक मागील आठवड्यात कमी राहिली. उठाव बऱ्यापैकी होता. यामुळे दर टिकून राहिले. टोमॅटोला प्रतिक्विंटल कमाल २८०० तर गवारीला ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

गवारीची आवक मागील तीन-चार महिन्यांपासून कमी आहे. आवक फक्त एरंडोल, जामनेर, पाचोरा या भागांतून होत आहे. खरिपासंबंधी जूनच्या सुरवातीला अनेक शेतकऱ्यांनी गवारचे पीक काढून क्षेत्र रिकामे केले. त्यात कापूस व इतर पिकांची पेरणी किंवा लागवड केली. यामुळे गवारची पावसाळ्यातील आवकही रखडत सुरू आहे. शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दर मिळत आहेत. 

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व गवारची आवक मागील आठवड्यात कमी राहिली. उठाव बऱ्यापैकी होता. यामुळे दर टिकून राहिले. टोमॅटोला प्रतिक्विंटल कमाल २८०० तर गवारीला ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

गवारीची आवक मागील तीन-चार महिन्यांपासून कमी आहे. आवक फक्त एरंडोल, जामनेर, पाचोरा या भागांतून होत आहे. खरिपासंबंधी जूनच्या सुरवातीला अनेक शेतकऱ्यांनी गवारचे पीक काढून क्षेत्र रिकामे केले. त्यात कापूस व इतर पिकांची पेरणी किंवा लागवड केली. यामुळे गवारची पावसाळ्यातील आवकही रखडत सुरू आहे. शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दर मिळत आहेत. 

मागील आठवड्यात गवारची प्रतिदिन दोन क्विंटल आवक झाली. त्यात संकरित गवारची सुमारे ७० ते ७५ किलो आवक होती. कूस असलेल्या किंवा गावरान गवारला ४५०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. मागील महिन्यातही दर सरासरी ४५०० रुपये प्रतिक्विंटलचेच होते. गवारची आवक पुढेही फारशी वाढणार नाही. कारण, क्षेत्र हवे तेवढे नाही. काढणी सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने रखडली आहे. संकरित प्रकारच्या गवारला प्रतिक्विंटल १९०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते. 

टोमॅटोची स्थानिक क्षेत्रातील म्हणजेच पाचोरा, एरंडोल, जामनेर, चोपडा भागांतून होणारी आवक जवळपास निम्म्याने घटली आहे. मागील महिन्याच्या अखेरीस टोमॅटोचे दर सुधारले. ते टिकून आहेत. आवक मागील आठवड्यात प्रतिदिन नऊ क्विंटल एवढी होती. आवक जामनेर, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड आणि धुळे, नाशिकमधील सटाणा भागातून होत आहे. दर प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये, असे मिळाले. मागील महिन्याच्या तुलनेत टोमॅटोच्या दरात फारशी घसरण झालेली नसल्याचे सांगण्यात आले. स्थानिक क्षेत्रातून ऑगस्टच्या अखेरिस आवक सुरू होईल. तोपर्यंत दर टिकून राहतील, असा अंदाज बाजार समितीमधील सूत्रांनी व्यक्त केला.

इतर बाजारभाव बातम्या
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर २५०० ते ३५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सांगलीच्या बाजारपेठेत गुळाला ५५०० रुपये...सांगली : महापुरामुळे तसेच बरेच रस्ते...
नाशिकमध्ये कांदा प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
जळगाव बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
पुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे...पुणे ः आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून पडणाऱ्या...
औरंगाबादेत भेंडी १००० ते ४००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गवार प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल ४५०० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल सरासरी ५६००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगावात टोमॅटो, गवारीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व...
सोलापुरात वांगी, घेवडा, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा वगळता शेतीमालाची आवक जेमतेमनागपूर ः हरभऱ्याच्या सरासरी एक हजार क्‍विंटलच्या...
पुण्यात कांदा, आले, बीटच्या दरात सुधारणापुणे ः खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात...