agriculture news in marathi, jalgao in objective of 42 million trees | Agrowon

जळगाव जिल्ह्यात यंदा ४२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 जून 2018

जळगाव : शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड अभियानात यंदा जळगाव जिल्ह्यासाठी ४२ लाख ४३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यासाठी आतापर्यंत ४३ लाख खड्डे तयार झाले आहेत. १ ते ३१ जुलैदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत लोकसहभागातून उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.

जळगाव : शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड अभियानात यंदा जळगाव जिल्ह्यासाठी ४२ लाख ४३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यासाठी आतापर्यंत ४३ लाख खड्डे तयार झाले आहेत. १ ते ३१ जुलैदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत लोकसहभागातून उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.

वृक्ष लागवड अभियानासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना श्री. पगार म्हणाले, की यंदा राज्यभरात १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. गेली तीन वर्षे व यंदा असे एकूण ५० कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट होते. यंदाच्या मोहिमेत जळगाव जिल्ह्यासाठी ४२ लाख ४३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ४२ लाख ९३ हजार ५१७ खड्डे खोदून तयार आहेत.
ग्रामपंचायतींनाही उद्दिष्ट

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रत्येकी ११२५ रोपे लावायची असून, त्यासाठी वन विभाग ग्रामपंचायतींना उंच रोपे मोफत थेट वाहतूक करून उपलब्ध करून देईल. जिल्ह्यातील ११५० ग्रामपंचायतींनी यंदा एकूण १२ लाख ९३ हजार ७५० रोपे लावायची आहेत, असे त्यांनी सांगितले.

लोकसहभागाचे आवाहन
पत्रकार परिषदेस अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपवनसंरक्षक (यावल) संजीव दहिवले, सामाजिक वनीकरणाचे एस. डी. वाढई, रोहयो उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, वृक्ष लागवड अभियानाचे समन्वयक उदय सोनवणे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, सामाजिक संस्थांची बैठक घेऊन या अभियानात लोकसहभागासाठी आवाहन करण्यात आले.

या वृक्षांची होणार लागवड
वृक्ष लागवडीत प्रामुख्याने वृक्षप्रजातीतील बांबू, निंब, खैर, शिवण, शिसू, काशीद, मोहा, करंज, महारुख, साग, अंजन, रेनट्री, वड, पिंपळ, शिरस आदींसह फळझाडांमध्ये चिंच, जांभूळ, आवळा, कवीठ, सिताफळ, विलायती चिंच, आंबा, भोकर यांचा समावेश आहे.

८९ टक्के रोपे जगली
वृक्ष लागवड अभियानात २०१६ मध्ये जिल्ह्यात १२ लाख ७५ हजार उद्दिष्टापैकी प्रत्यक्षात १३ लाख ६९ हजार १६९ रोपे लावण्यात आली, त्यापैकी ७७.१८ टक्के जगली; तर २०१७ मध्ये २० लाख ८९ हजार ४९ वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टापैकी २२ लाख ५२ हजार ५४५ रोपे लावण्यात आली. त्यातून ८९.१२ टक्के रोपे जिवंत राहिल्याचा दावा वन विभागातर्फे करण्यात आला आहे.

यंदाचे उद्दिष्ट असे
वन व वन्यजीव विभाग (जळगाव, यावल) : २१ लाख ५० हजार
सामाजिक वनीकरण विभाग : ६ लाख
ग्रामपंचायती (प्रत्येकी ११२५) : १२ लाख ५४ हजार ६५०
इतर विभाग : ३ लाख १८ हजार ४००

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...