जळगाव ‘झेडपी’ला ३ जानेवारीला मिळणार नवा अध्यक्ष

Jalgao zillha parishad will get new president on January 5
Jalgao zillha parishad will get new president on January 5

जळगाव ः जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ संपला असून, नूतन अध्यक्ष निवडीसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण निघाले असून, नव्या वर्षात म्हणजे ३ जानेवारीला नवीन अध्यक्ष लाभणार आहेत; तसेच पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड २ जानेवारीला होणार आहे. यामुळे आता राजकीय हालचालींना गती येणार आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचे अध्यक्ष निवडीकडे लक्ष लागले होते. अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव निघाले असून, सलग तिसऱ्यांदा महिलाराज येणार आहे. महिला राखीव असे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेकांना थांबा लागला होता, तो आता पुन्हा सुरू होणार आहे. मुदत संपल्यानंतर आणखी दोन महिने मुदतवाढ मिळणार मिळणार अशीच चर्चा रंगत होती; परंतु अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी तारीख जाहीर करण्यात आली असून, ही निवड प्रक्रिया ३ जानेवारीला होईल. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश पारीत करण्यात आला. 

असा आहे कार्यक्रम  अध्यक्षपदाची निवड ३ जानेवारीला सकाळी अकराला जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात उपजिल्हाधिकारी (महसूल) रवींद्र भारदे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. सकाळी ११ ते १ दरम्यान अर्ज भरणे, यानंतर अर्जांची छानणी होऊन २ वाजेपर्यंत माघारीची वेळ आहे. यानंतर अध्यक्ष निवड केली जाणार आहे. तसेच पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींची निवड संबंधित तालुक्‍यांच्या पंचायत समिती कार्यालयात २ जानेवारीला सकाळी अकराला होईल. तर विषय समित्यांच्या सभापतींची निवड नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ६ जानेवारीला आहे. 

खडसे गटाकडे लक्ष  जिल्हा परिषदेत असलेल्या पक्षीय बलाबलामध्ये भाजपने काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. शिवाय, राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांना गैरहजर ठेवले होते. परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक सदस्य अपात्र झाल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सत्तास्थापनेचे समीकरण बदलले आहे. दोन सदस्य अपात्र झाल्याने सत्तास्थापनेसाठी ३३ बहुमत लागणार आहे. एवढे सदस्य भाजपचे असल्याने या निवडीत काँग्रेसला सोबत घेणार की नाही, याबाबतही प्रश्‍नचिन्ह आहे; तर राज्यात झालेल्या महाविकास आघाडीप्रमाणे जिल्हा परिषदेत समीकरण जोडले, तरी तिन्ही पक्षांचे मिळून ३२ सदस्य होत आहेत. यामुळे अध्यक्ष निवडप्रक्रियेत भाजपच्या नाराज सदस्यांसह खडसे गटातील सदस्यांच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com