जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर

जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे. मध्यंतरी एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागन झाल्याने क्वारंटाइन झालेले इतर अधिकारी कामावर येवू लागले आहेत.
Jalgaon ‘ZP’ is on track
Jalgaon ‘ZP’ is on track

जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे. मध्यंतरी एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागन झाल्याने क्वारंटाइन झालेले इतर अधिकारी कामावर येवू लागले आहेत. 

जिल्हा परिषदेत एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने सर्व १२ विभागांचे अधिकारी, काही कर्मचारी क्वारंटाइन झाले होते. सध्या उष्णता आहे. अशात पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी मोठी आहे. रस्ते बांधकामासाठी बांधकाम विभागाकडेही कामांचा तगादा आहे. खते, बियाण्यांची उचल सुरू आहे. कापूस बियाण्यांच्या काळाबाजाराची चर्चाही आहे. यात कृषी विभागाचे कामकाजही पूर्वपदावर येण्याची अपेक्षा होती. 

जिल्हा परिषदेचे अधिकारी कामावर येत आहेत. काही विभागांचे कामकाज घरबसल्या (वर्क फ्रॉम होम) सुरू होते. आता सर्वच अधिकारी व कर्मचारी कामावर येवू लागले आहेत. जिल्हा परिषदेच्या रस्त्यांचे कामकाज सुरू झाले आहे.

प्रलंबित फायलीदेखील मार्गी लागत आहेत. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची रखडलेली कामेही हाती घेतल्याची माहिती आहे. कृषी विभागातर्फे बियाणे तपासणी, बैठका यासंबंधी कार्यवाही सुरू झाली आहे. पंचायत समित्यांमध्येही किमान ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहत असल्याची माहिती मिळाली.  ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्येही कर्मचारी संख्या १०० टक्के आहे. उष्माघात कक्ष आरोग्य केंद्रांमध्ये सज्ज ठेवल्याचा दावाही करण्यात आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com