agriculture news in Marathi, Jalgaon 180; In the footsteps of the tanker in Dhule, Nandurbar, | Agrowon

जळगावात १८०; धुळे, नंदुरबारात टॅंकरची वाटचाल शतकाकडे

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 मे 2019

जळगाव ः खानदेशात सुमारे एक हजार गावे टंचाईच्या छायेत आली आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे १८० टॅंकर सुरू आहेत. तर धुळे- नंदुरबारात मिळून ८९ पेक्षा अधिक टॅंकर सुरू आहेत. 

तात्पुरत्या पाणी योजना, उपाय यांना यश येत नसल्याची स्थिती आहे. कारण, भूगर्भातील जलसाठे आटले आहेत. जळगाव जिल्ह्यात १४८ गावांमध्ये तीव्र टंचाई आहे. धुळ्यात ७१ तर नंदुरबारात सुमारे ६७ गावांमध्ये तीव्र टंचाई आहे.

जळगाव ः खानदेशात सुमारे एक हजार गावे टंचाईच्या छायेत आली आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे १८० टॅंकर सुरू आहेत. तर धुळे- नंदुरबारात मिळून ८९ पेक्षा अधिक टॅंकर सुरू आहेत. 

तात्पुरत्या पाणी योजना, उपाय यांना यश येत नसल्याची स्थिती आहे. कारण, भूगर्भातील जलसाठे आटले आहेत. जळगाव जिल्ह्यात १४८ गावांमध्ये तीव्र टंचाई आहे. धुळ्यात ७१ तर नंदुरबारात सुमारे ६७ गावांमध्ये तीव्र टंचाई आहे.

धुळ्यात ३५ गावांमध्ये २८ टॅंकर सुरू आहेत. नंदुरबारातही सुमारे ७५ गावांमध्ये ६१ टॅंकर सुरू आहेत. टॅंकर मागणीचे प्रस्ताव येतच आहे. विशेष म्हणजे जेथे जलयुक्त शिवार अभियानातून कामे घेतली, तेथेही टॅंकरची मागणी आहे. यामुळे प्रशासनाची टॅंकर मंजूर करताना अडचण होत आहे. हे जलयुक्त शिवार अभियानाचे अपयश असल्याचे चर्चिले जात असल्याने या गावांमधील टॅंकरचे प्रस्ताव उशिराने मंजूर केले जात आहे.

जळगाव जिल्ह्यात सुमारे ३०० गावांसाठी ३१३ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. विहीर खोलीकरण, नव्या कूपनलिका तयार करण्याची कार्यवाहीदेखील सुरू आहे. परंतु, जलस्रोत हवे तसे मिळत नसल्याने टंचाई दूर करण्यासंबंधी अपयश येत असल्याचे प्रशासनातील मंडळीचे म्हणणे आहे. 

दोन नद्यांचे आवर्तन दिलासादायक
गिरणा नदीतून १० मे रोजी चौथे आवर्तन नदीत पाणीटंचाई निवारणार्थ सोडले. त्याचा लाभ धरणगाव, जळगाव, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव या तालुक्‍यांमधील सुमारे १०० गावांना झाला आहे. तर पांझरा प्रकल्पातून साक्री तालुक्‍यातील टंचाई निवारणार्थ पाण्याचे आवर्तन सोडले आहे. त्याचाही लाभ झाल्याचे सांगितले जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
मक्यापासून निर्मित जैवप्लॅस्टिकचा...मक्यातील स्टार्च आणि अन्य नैसर्गिक घटकांचा वापर...
जुन्या बागेमध्ये घडाच्या विकासाकडे लक्ष...द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी...
औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक...औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत...
औरंगाबाद जिल्ह्यात गव्हावर आढळला...औरंगाबाद : जिल्ह्यातील गव्हाच्या पिकावर खोडमाशीचा...
नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी...वाशीम : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत...
रत्नागिरी जिल्ह्यात खरिपाच्या विमा...रत्नागिरी : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत ऊस...कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना नऊ टक्के वाढ...
‘नासाका’ सुरू करण्यासाठी शरद पवारांना...नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली...
कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा...नाशिक : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दोन...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पीकविम्याच्या भरपाईसाठी प्रस्ताव पाठवा...सोलापूर : उत्तर सोलापूर, नरखेड, मार्डी, शेळगी,...
पुणे विभागातील १७०० गावांमधील भूजल...पुणे  ः यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला,...
नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेसात...नगर  ः जिल्ह्यात १४ सहकारी व नऊ खासगी असे...
नवीन लाल कांद्याच्या दरात चढ-उतारनाशिक: अतिवृष्टीमुळे अनेक खरीप कांदा लागवडी बाधित...
कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल...
भंडारा : शेतकऱ्यांना आज होणार विमा...मुंबई : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९...
...म्हणून सहा एकरांवरील द्राक्षबागेवर...नाशिक  : निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे...
राज्याला केंद्राकडून १५ हजार कोटी येणे...मुंबई  :  वस्तू व सेवा कर (जीएसटी)...
शिवनेरीवरून कर्जमाफीची घोषणा होण्याची...पुणे  ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी...
पंकजा मुंडे यांच्या स्वाभिमान...बीड  : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या...