agriculture news in marathi, Jalgaon APMC grain Auction remains closed | Agrowon

जळगाव बाजार समितीत धान्याचे लिलाव बंदच

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

जळगाव  ः जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व महत्त्वाच्या जळगाव बाजार समितीच्या धान्य मार्केट यार्डात धान्याची खरेदी - विक्रीसंबंधी लिलाव होत नसल्याची माहिती आहे. शेतीमाल अडतदाराकडे १५ ते २५ दिवस पडून असतो. शेतकऱ्यांसमोर त्याची तोलाईदेखील होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमध्ये आहेत. 

जळगाव  ः जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व महत्त्वाच्या जळगाव बाजार समितीच्या धान्य मार्केट यार्डात धान्याची खरेदी - विक्रीसंबंधी लिलाव होत नसल्याची माहिती आहे. शेतीमाल अडतदाराकडे १५ ते २५ दिवस पडून असतो. शेतकऱ्यांसमोर त्याची तोलाईदेखील होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमध्ये आहेत. 

मध्यंतरी यासंदर्भात बाजार समितीचे कर्मचारी, प्रशासन यांनी अडतदारांच्या प्रतिनिधींनी लिलाव सुरू करण्याची विनंती केली. परंतु, यास अडतदार, व्यापारी दाद देत नसल्याची स्थिती आहे. यामुळे बाजारातील आवकेवर परिणाम झाला आहे. फक्त व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार वाढत असून, बाजार समितीबाहेर हे व्यवहार होत असल्याचेही सांगितले जात आहे.

यामुळे मोठा महसूल बुडत असून, विविध खर्च भागविताना बाजार समिती प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहेत. उन्हाळ्यात बाजारात लिलाव सुरू होते. परंतु, खरिपातील धान्य जेव्हापासून येत आहे, तेव्हापासून लिलावच बंद आहेत. उडीद, मुगाची खरेदी अडतदारांनी मनमानी करून केली. उडदाची नगण्य आवक झाली. मुगाची आवक जालना, औरंगाबाद, बुलडाणा भागांतून झाली. तेथील व्यापाऱ्यांकडून ही आवक झाली. व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार बाजार समितीबाहेर झाले. रोज अडीच ते तीन हजार क्विंटल मुगाची आवक व्यापाऱ्यांकडून सुरू होती. परंतु बाजारात शुकशुकाट दिसत होता, कारण बाजार समितीबाहेर खरेदी - विक्री होऊन मूग थेट डाळ मिलांमध्ये पाठविला जात होता. आता सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. पुढे ज्वारी, बाजरीची आवक सुरू होईल. परंतु, तरीदेखील लिलाव सुरू न झाल्याने शेतकरी आपला शेतीमाल चोपडा, अमळनेरच्या बाजारात पाठवीत आहेत.

शेतकऱ्यांसमोर तोलाई, लिलाव झाल्यास दर काय मिळाले, किती नेमके वजन आले, हे दिसून येते. परंतु, जळगाव बाजारात लिलाव होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. अडतदारांची लॉबी प्रशासनासह पदाधिकाऱ्यांनाही जुमानत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...