Agriculture news in marathi; Jalgaon Bazar Samiti starts work on new pellets | Agrowon

जळगाव बाजार समितीत नवीन गाळ्यांचे काम सुरू

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

जळगाव  ः जळगाव बाजार समितीमधील धान्य मार्केट यार्डात मुख्य प्रवेशद्वारानजीक १८० गाळ्यांचे दुमजली संकुल उभारण्यास सुरवात झाली आहे. हे संकुल येत्या चार महिन्यांत बांधून पूर्ण होईल. 

हे नवीन व्यापारी संकुल आडत असोसिएशनने विरोध केल्याने वादात अडकले होते. यासंदर्भात न्यायालयातही आडतदारांची दाद मागितली होती. संकुलामुळे यार्डातील पहिल्या रांगेतील आडतदारांना रस्ता कमी मिळेल. कोंडी होईल, लिलाव, तोलाईसंबंधी अडचणी येतील, असे आडतदारांचे म्हणणे होते. यावर बाजार समिती प्रशासनाने आपली बाजू न्यायालयात मांडली.

जळगाव  ः जळगाव बाजार समितीमधील धान्य मार्केट यार्डात मुख्य प्रवेशद्वारानजीक १८० गाळ्यांचे दुमजली संकुल उभारण्यास सुरवात झाली आहे. हे संकुल येत्या चार महिन्यांत बांधून पूर्ण होईल. 

हे नवीन व्यापारी संकुल आडत असोसिएशनने विरोध केल्याने वादात अडकले होते. यासंदर्भात न्यायालयातही आडतदारांची दाद मागितली होती. संकुलामुळे यार्डातील पहिल्या रांगेतील आडतदारांना रस्ता कमी मिळेल. कोंडी होईल, लिलाव, तोलाईसंबंधी अडचणी येतील, असे आडतदारांचे म्हणणे होते. यावर बाजार समिती प्रशासनाने आपली बाजू न्यायालयात मांडली.

शिवाय शासनाने मुख्य रस्त्यासंबंधी दिलेल्या आदेशानुसार या संकुलाचे काम सुरू झाले. हे १८० गाळ्यांचे संकुल आहे. चार इमारतींमध्ये हे संकुल उभारले जात आहे. संकुलात प्रवेश करण्यासाठी दोन मुख्य प्रवेशद्वार असतील. या संकुलाच्या गाळ्यांचे दरवाजे जळगाव-औरंगाबाद मार्गाकडे असतील. सध्या पाया व त्यासंबंधीचे स्टीलवर्क सुरू आहे. बांधकामानजीक पत्रांची कुंपण भिंत उभारण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यानतंर ही कुंपण भिंत हटविली जाईल. 

संकुलातील गाळ्यांची विक्री दिवाळीच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. किमती विकासक निश्‍चित करील. त्याची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. परंतु, या संकुलाच्या माध्यमातून बाजार समितीला दरमहा एक लाख ८० हजार रुपये शुल्क भाड्यापोटी मिळेल. या संकुलातील गाळ्यांचा उपयोग खरेदीदार धान्य खरेदी-विक्री व्यक्तिरिक्त इतर कारणांसाठीदेखील करू शकतील. या संकुलात रेस्टॉरंट, कृषी केंद्र, किरकोळ धान्य विक्री दुकाने आदी मोठ्या संख्येने सुरू होतील, असा अंदाज आहे.


इतर ताज्या घडामोडी
काटेवाडीत होणार पहिला व्यावसायिक मुरघास...पुणे  ः दुष्काळी स्थितीत जनांवरासाठी चारा...
ऊस वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा ः...पुणे ः चालू वर्षी पुणे जिल्ह्यातील साखर...
नांदेड : रब्बीच्या पेरणीने सर्वसाधारण...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात बुधवार (ता. ११) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात प्रतिकूल हवामानाचा तूर...सांगली  : जिल्ह्यात पोषक हवामानाअभावी तूर...
तीन जिल्ह्यांत मुगाचे दोन कोटी ४० लाख ...नांदेड  ः किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
बारदान्याअभावी वाढल्या धान...भंडारा ः धान उत्पादकांसमोरील अडचणी संपता संपत...
नक्षलग्रस्त जिल्हे पाणीपट्टी सवलतीतून...गोंदिया  ः नक्षलग्रस्त भाग, तसेच पंतप्रधान...
कोल्हापुरात पुष्पप्रदर्शनाला मोठा...कोल्हापूर : स्वागत कमानीपासूनच विविध प्रकारच्या...
घोडेगाव उपबाजारात नव्या कांद्याला ११...सोनई, जि. नगर  : नेवासे बाजार समितीच्या...
फडणवीस सरकारच्या शिवस्मारकाच्या निविदा...नागपूर : मुंबईतील बहुचर्चित शिवस्मारकाच्या...
अवकाळीग्रस्तांना हेक्टरी २५ हजारांची...नागपूर : ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...
गुलटेकडीत बटाटा, फ्लॉवर, शेवग्याच्या...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची...पुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान...
हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच...मुंबई  ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू...
गायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढपुणे  ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून...
लाल कांद्याच्या दरात सुधारणा नाशिक  : दरवर्षीच्या प्रमाणे लाल कांद्याची...
सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीपोटी मिळणार...सोलापूर  : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात...
ठाकरे सरकारचे उद्यापासून पहिलेच अधिवेशनमुंबईः नागपूर येथील छोटेखानी हिवाळी अधिवेशनात...
ग्रासपेंटिंगच्या माध्यमातून...शिराढोण ः उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी (ता. कळंब...
तनपुरे कारखाना चालावा ही जिल्हा बॅंकेची...नगर : "डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याची...