जळगावात वांगे प्रतिक्विंटल १००० रुपये

जळगावात प्रतिक्विंटल १००० रुपये
जळगावात प्रतिक्विंटल १००० रुपये

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्यांची आवक मागील पंधरवड्यानंतर कमी झाली आहे. प्रतिदिन १७ क्विंटल एवढी आवक झाली. तर त्यास प्रतिक्विंटल १००० रुपये असे सरासरी दर मिळाले आहेत. आवक जामनेर, पाचोरा, जळगाव, भुसावळ भागातून होते.

सध्या भरताच्या वांग्यांची आवकही वाढली आहे. त्यांना किमान ८०० रुपयांपर्यंतचे दर आहेत. लहान आकाराच्या काटेरी वांग्यांची आवक भरताच्या वांग्यांच्या तुलनेत अधिक आहे. पुढे आवक आणखी कमी होईल, अशी शक्‍यता बाजार समितीमधील सूत्रांनी व्यक्त केली. गुरुवारी (ता. ९) मराठा आंदोलनामुळे आवक कमी झाली. भरताच्या वांग्यांना १२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाल्याचे सांगण्यात आले. हिरव्या लहान काटेरी वांग्यांची आवकही कमीच आहे.

आवकेची माहिती (दर प्रतिक्विंटल व रुपयांत)
तारीख आवक किमान दर कमाल दर सरासरी दर
९ ऑगस्ट १२ ६०० १३०० ९००
२ ऑगस्ट १८ ८०० १४०० १०००
२६ जुलै २३ ७०० १२०० ९००
१९ जुलै २१ ७०० १३०० १०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com