Agriculture news in marathi, In Jalgaon, brinjal Rs 1500 to Rs 2800 per quintal | Page 2 ||| Agrowon

जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८) वांग्यांची ११ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २८०० रुपये दर मिळाला. दर्जेदार हिरव्या, लहान काटोरी वांग्यांना अधिकचे दर मिळाले. आवक जामनेर, पाचोरा, औरंगाबादमधील सिल्लोड, सोयगाव, जालना भागांतून होत आहे. वांग्यांचे दर टिकून असल्याचे समितीतील सूत्रांनी सांगितले. 

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८) वांग्यांची ११ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २८०० रुपये दर मिळाला. दर्जेदार हिरव्या, लहान काटोरी वांग्यांना अधिकचे दर मिळाले. आवक जामनेर, पाचोरा, औरंगाबादमधील सिल्लोड, सोयगाव, जालना भागांतून होत आहे. वांग्यांचे दर टिकून असल्याचे समितीतील सूत्रांनी सांगितले. 

बाजारात गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. कूस असलेल्या गवारीला चांगला उठाव होता. गवारीला प्रतिक्विंटल ४२०० रुपये दर मिळाला. संकरित प्रकारच्या गवारीला २५०० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर राहिला. बिटाची पाच क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १४०० ते २२०० रुपयांचा दर मिळाला. लिंबांची आठ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १८५० ते २४०० रुपये दर राहिला. 

कोथिंबिरीची १३ क्विंटल आवक झाली. तिला १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. शेवग्याची दोन क्विंटल आवक झाली. त्याच्या शेंगांना प्रतिक्विंटल १८०० ते २४०० रुपये दर मिळाला. आल्याची २३ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल २००० ते ५१०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ३५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ११०० ते १८०० रुपये दर मिळाला.

डाळिंबाची ३० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २२०० ते ४८०० रुपये दर मिळाला. बटाट्याची ३०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ६५० ते ११०० रुपयांचा दर राहिला. भेंडीची १३ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये दर मिळाला. गंगाफळाची ३५ क्विंटल आवक झाली, तर दर प्रतिक्विंटल ७०० ते ९०० रुपये मिळाला. 

टोमॅटोची १५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ७५० ते १२०० रुपये दर होता. कोबीची १७ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १७५० ते २८०० रुपये मिळाला. गाजराची १२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाला. कारल्याची दोन क्विंटल आवक झाली. त्यास कमाल दर प्रतिक्विंटल २५०० रुपयांचा मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २४०० ते ४००० रुपये दर होता. पालकाची दोन क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १२०० रुपयांचा दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...
सोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...
नगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
सातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...
पावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...