agriculture news in Marathi, Jalgaon in Carla Salary Survive | Agrowon

जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकून

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जानेवारी 2019

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात चवळी व कारल्यांची आवक कमी राहिली. परिणामी दर टिकून होते. कारल्यांना प्रतिक्विंटल २८०० रुपये तर चवळीलाही सरासरी २६०० रुपये दर मिळाला. 

कारल्यांची आवक जामनेर, पाचोरा, एरंडोल भागांतून होत आहे. आवक मागील दीड ते दोन महिन्यांपासून कमी किंवा स्थिर आहे. कारल्यांना एकच दर मिळत आहे. मागील आठवड्यात प्रतिदिन चार क्विंटल सरासरी आवक झाली. दर २८०० रुपये प्रतिक्विंटलचे मिळाले. त्यांना चांगला उठाव आहे. पुढे कारल्यांची आवक आणखी कमी होऊ शकते. 

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात चवळी व कारल्यांची आवक कमी राहिली. परिणामी दर टिकून होते. कारल्यांना प्रतिक्विंटल २८०० रुपये तर चवळीलाही सरासरी २६०० रुपये दर मिळाला. 

कारल्यांची आवक जामनेर, पाचोरा, एरंडोल भागांतून होत आहे. आवक मागील दीड ते दोन महिन्यांपासून कमी किंवा स्थिर आहे. कारल्यांना एकच दर मिळत आहे. मागील आठवड्यात प्रतिदिन चार क्विंटल सरासरी आवक झाली. दर २८०० रुपये प्रतिक्विंटलचे मिळाले. त्यांना चांगला उठाव आहे. पुढे कारल्यांची आवक आणखी कमी होऊ शकते. 

चवळीची आवक औरंगाबादमधील घाट परिसरातील गावे, पाचोरा व यावल भागांतून होते. आवक प्रतिदिन चार क्विंटलपर्यंतच झाली. प्रतिक्विंटल २००० ते २८००० रुपये आणि सरासरी २६०० रुपये दर मिळाला. चवळीची आवकही स्थिर असल्याने दर टिकून असल्याचे बाजार समितीमधील सूत्रांनी सांगितले. 

भेंडीची प्रतिदिन १८ क्विंटलपर्यंत आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला. आवकेत काहीशी वाढ दिसून आली. वाल शेंगांची प्रतिदिन नऊ क्विंटलपर्यंत आवक झाली. या शेंगांची आवकही काहीशी वाढली. वाल शेंगांना ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. कोथिंबीर, मेथीची आवकही स्थिर होती. 

मेथीची प्रतिदिन आठ क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटल १००० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. तर कोथिंबिरीची प्रतिदिन सात क्विंटलपर्यंत आवक होती. कोथिंबिरलादेखील ९०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. पपईची आवक काहीशी कमी झाली. पपईला प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. आवक प्रतिदिन सात क्विंटलपर्यंत झाली. पपईची आवक यावल, पाचोरा, जळगाव भागांतून झाली. 

१० दिवसांपासून केळीचे दर ९२० रुपये
मागील १०-१२ दिवसांपासून रावेरात नवती केळीचे दर ९२० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. नवती केळीची आवक कमी अधिक होत आहे. परंतु जसजशी उत्तरेकडील धुके व थंडी कमी होत आहे, तशी केळीची वाहतूक गती घेत आहे. केळीबाबत सध्या अपेक्षित दर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रावेर, यावल भागांत अर्ली नवती केळीमध्ये काढणी सुरू आहे. तसेच मुक्ताईनगरातही काढणीला सुरवात झाली आहे.


इतर ताज्या घडामोडी
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...