जळगावात कोथिंबीर २५०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल

जळगावात कोथिंबीर २५०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल
जळगावात कोथिंबीर २५०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १३) कोथिंबिरीला २५००  ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आवक आठ क्विंटल झाली. आवक जामनेर, पाचोरा, यावल आदी भागांतून होत आहे.

बाजारात शेवग्याची दोन क्विंटल आवक झाली. शेवग्याच्या शेंगांना प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर मिळाला. बिटची पाच क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ९०० ते १८०० रुपये दर मिळाला. डाळिंबाची २८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १८०० ते ४८०० रुपये दर मिळाला. लिंबूची सहा क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १८०० ते २६०० रुपये दर होता. आल्याची २४ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ५२०० रुपये दर मिळाला. 

बटाट्याची २८०  क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते ११०० रुपये दर होता. भेंडीची ११ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ११००  ते १६०० रुपयांचा दर मिळाला. गंगाफळाची २५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाला. कोबीची २५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० ते २३०० रुपये मिळाला. गाजराची १२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते ११०० रुपये दर मिळाला. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ४५००  रुपये होता.  

लाल कांद्याची ८०० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ४५० ते  १३५० रुपये होता. कारल्याची दोन क्विंटल आवक झाली. त्यास कमाल दर प्रतिक्विंटल २८०० रुपये मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २२०० ते ३८०० रुपये दर मिळाला. पालकाची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल  १२०० रुपये मिळाला.

टोमॅटोची आठ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १८०० ते २६०० रुपये दर होता. हिरव्या मिरचीची ३५ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १६००  ते २२०० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com