जळगावात कोथिंबीर २५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल

जळगावात कोथिंबीर २५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल
जळगावात कोथिंबीर २५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २६) कोथिंबिरीला २५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आवक आठ क्विंटल झाली. आवक जामनेर, पाचोरा, यावल आदी भागातून होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 

बाजारात शेवग्याची दोन क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये दर मिळाला. बिटची पाच क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १७०० रुपये दर मिळाला. डाळिंबाची २७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ५६०० रुपये दर मिळाला. खरबुजाची १२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाला. लिंबूची नऊ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ५२०० रुपये दर होता.

मोसंबीची ३१ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १००० ते ३७०० रुपये मिळाला. कलिंगडाची २० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल  ५०० ते १००० रुपये दर होता. आल्याची २८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ६०८० रुपये दर मिळाला.  बटाट्याची २५० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते ११५० रुपये दर होता. भेंडीची नऊ क्विंटल आवक तर, दर प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये मिळाला. गंगाफळाची १० क्विंटल आवक झाली. त्यास दर प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये होता.

कोबीची २२ क्विंटल आवक झाली. दर ११०० ते २२०० रुपये मिळाला. गाजराची १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते ११०० रुपये  मिळाले. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ५५०० रुपये होता. कैरीची १८ क्विंटल आवक, तर दर ६०० ते १४०० रुपये  मिळाला. लाल कांद्याची १०७० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ३२५ ते ८५० रुपये होता. 

कारल्याची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ६००० रुपये मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल २६०० ते ५८०० रुपये दर होता. पालकाची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १४०० रुपये मिळाला. टोमॅटोची २८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते ११०० रुपये दर होता. हिरव्या मिरचिची ३२ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com