Agriculture news in Marathi, Jalgaon, Dhule district in two percent rainfall | Agrowon

जळगाव, धुळे जिल्ह्यात पाऊस ८१ टक्‍क्‍यांवर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

जळगाव ः खानदेशात जळगाव व धुळे जिल्ह्यात सरासरीच्या ८१ टक्‍क्‍यांवर पाऊस झाला आहे. पावसामध्ये सातत्य असल्याने अनेक प्रकल्पांमधील आवक सुरूच आहे. जळगाव जिल्ह्यातील अंजनी प्रकल्पातील साठा तीन वर्षांनंतर प्लसमध्ये आला. हा प्रकल्प २१ टक्के भरला आहे; तर धुळ्यातील अमरावती व नंदुरबारमधील शिवन प्रकल्प १०० टक्के भरण्याची अपेक्षा आहे. 

जळगाव ः खानदेशात जळगाव व धुळे जिल्ह्यात सरासरीच्या ८१ टक्‍क्‍यांवर पाऊस झाला आहे. पावसामध्ये सातत्य असल्याने अनेक प्रकल्पांमधील आवक सुरूच आहे. जळगाव जिल्ह्यातील अंजनी प्रकल्पातील साठा तीन वर्षांनंतर प्लसमध्ये आला. हा प्रकल्प २१ टक्के भरला आहे; तर धुळ्यातील अमरावती व नंदुरबारमधील शिवन प्रकल्प १०० टक्के भरण्याची अपेक्षा आहे. 

गेल्या आठवड्यात अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. कुठेही अतिवृष्टी झालेली नाही. पिकांसाठी अनुकूल असा पाऊस पडला. गेल्या २४ तासांत सोमवारी (ता. २) सकाळी आठ वाजेपर्यंत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जळगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, धुळ्यातील शिरपूर, साक्री, धुळे या भागातही पावसाने हजेरी लावली. नंदुरबारमधील नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या भागातही जोरदार पाऊस झाल्याची माहिती मिळाली. 

जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ८२ टक्के; तर धुळ्यातही ८० टक्‍क्‍यांवर पाऊस झाला. मागील वर्षी जळगाव जिल्ह्यात अखेरपर्यंत फक्त ६५ टक्के पाऊस पडला होता; तर धुळ्यात ६० टक्‍क्‍यांवर पाऊस झाला होता. नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १६० टक्‍क्‍यांवर पाऊस झाला आहे. पावसाचे अधिकृतपणे २८ दिवस आणखी राहिले आहेत. यामुळे पाऊस १०० टक्‍क्‍यांवर जाईल. तसेच अनेक प्रकल्प १०० टक्के भरतील, अशी अपेक्षा आहे. 

गेल्या २४ तासांतील पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः जळगाव जिल्हा ः चाळीसगाव १६, पाचोरा ११, एरंडोल ९, जामनेर ५, बोदवड ७. धुळे जिल्हा - शिरपूर ७, धुळे ९, साक्री ११. 

अनेक प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील तोंडापूर, मंगरूळ, सुकी, अभोरा, धुळ्यातील पांझरा, मालनगाव, जामखेडी, बुराई, करवंद, नंदुरबारमधील दरा व रंगावली या प्रकल्पांचा समावेश आहे. गिरणा नदीवरील नाशिक जिल्ह्यातील हरणबारी व केळझर प्रकल्पदेखील १०० टक्के भरले आहेत.

धुळे जिल्ह्यातील अमरावती प्रकल्पाचा साठा वाढत असून, तो ९०.२५ टक्के आहे. तर नंदुरबारमधील शिवन प्रकल्पातील साठा ९४ टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. मुक्ताईनगर (जि. जळगाव) नजीकच्या तापी नदीवरील हतनूर प्रकल्पात आवक सुरूच असून, त्याचे १० दरवाजे सोमवारी सकाळी उघडे होते. तर धुळे जिल्ह्यातील अनेर प्रकल्पाचे सहा दरवाजे पूर्ण उघडण्यात आले होते. पण जळगाव जिल्ह्यातील मन्याड, अग्नावती व भोकरबारी हे प्रकल्प कोरडेच आहेत. 

विविध प्रकल्पांमधील साठा (टक्के) ः गिरणा ७९.४०, वाघूर ५३, अंजनी २१, बोरी ७३.६४, बहुळा ५३.५०, हिवरा २१.९२. धुळे ः कनोली ३२.१९.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...