Agriculture news in marathi In Jalgaon district, 369 scarcity affected villages | Page 2 ||| Agrowon

जळगाव जिल्ह्यात ३६९ टंचाईग्रस्त गावे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

जळगाव  ः जिल्ह्यात यंदा १३९ टक्के पाऊस झाल्याने टंचाई जाणवणार नसल्याची चिन्हे होती. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी केवळ १३ गावांत टंचाईसाठी १३ लाखांची तरतूद झाली. मात्र, आता टंचाईग्रस्त गावांची संख्या १३ वरून ३६९ वर गेली आहे. तर टंचाई कृती आराखडा तब्बल २ कोटी ३६ लाख २० हजार रुपयांपर्यंत पोचला आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये ४०४ योजना राबविल्या जाणार आहेत. 

जळगाव  ः जिल्ह्यात यंदा १३९ टक्के पाऊस झाल्याने टंचाई जाणवणार नसल्याची चिन्हे होती. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी केवळ १३ गावांत टंचाईसाठी १३ लाखांची तरतूद झाली. मात्र, आता टंचाईग्रस्त गावांची संख्या १३ वरून ३६९ वर गेली आहे. तर टंचाई कृती आराखडा तब्बल २ कोटी ३६ लाख २० हजार रुपयांपर्यंत पोचला आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये ४०४ योजना राबविल्या जाणार आहेत. 

एप्रिल ते जून या कालावधीत जाणवणाऱ्या संभाव्य टंचाईसंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडून संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. हा आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जातो. गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरी १३८ टक्के पाऊस झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने यंदा पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा अहवाल दिला होता. 
मात्र, प्रशासनाच्या सूचनेनुसार पुन्हा सर्वेक्षण करून संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. सुरुवातीला अवघ्या १३ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. या १३ गावांसाठी १३ लाख ८० हजार रुपये रकमेचा आराखडा तयार करण्यात आला. तो जिल्हा प्रशासनाला सादरही करण्यात आला होता. 

मात्र, त्यात दुरुस्त्या सुचविण्यात येऊन तो जिल्हा परिषदेकडे परत पाठविण्यात आला होता. जिल्हा परिषदेने आज सुधारित आराखडा सादर केला असून, हा आराखडा तब्बल २ कोटी ३६ लाखांनी वाढला आहे. 

असा आहे आराखडा 
सुधारित आराखड्यात संभाव्य पाणीटंचाईच्या गावांची संख्या वाढली असून, आता ३७९ गावांमध्ये ४०४ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. हा आराखडा आता २ कोटी ५० लाख ६० हजार रुपये इतक्‍या रकमेचा झाला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत संभाव्य टंचाई भासणाऱ्या गावांमध्ये या योजना राबविल्या जाणार आहेत.


इतर ताज्या घडामोडी
दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा ...मुंबई: दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा...
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक...चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव...