जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेचे ८५ टक्के काम पूर्ण

जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेचे ८५ टक्के काम पूर्ण
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेचे ८५ टक्के काम पूर्ण

जळगाव : जळगाव जिल्ह्यात महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण करण्यासंबंधी प्रशासनाला जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक आदींनी सूचना दिल्या आहेत. २१ फेब्रुवारीपासून या संदर्भातील याद्या गावांमध्ये संबंधित संस्थेत प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती आहे.   जिल्हा बॅंकेकडील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यापैकी राज्यातील सुमारे ३६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणारी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना १५ एप्रिलपूर्वी पूर्ण करावी. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात झाल्यापासून दररोज त्याचा आढावा घेतला जाणार आहे. २१ फेब्रुवारीपासून गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्या वेळी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होईल. अशा वेळी प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगली वागणूक द्यावी. त्याचे म्हणणे ऐकून घ्या. त्याची तक्रार स्थानिक पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करा. ही कर्जमुक्त राबविताना शेतकऱ्यावर आपण उपकार करतोय या भावनेतून काम करू नका, असे प्रशासनाने संबंधितांना सांगितले आहे.  पोर्टलवर ८८ टक्के डाटा अपलोड  कर्जमुक्ती योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर ८८ टक्के डाटा अपलोड करण्यात आला आहे. सुमारे ३६.४१ लाख शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज घेतले आहे. त्यापैकी ३२ लाख १६ हजार २७८ शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाली आहे. आधार क्रमांक प्रमाणीकरणाची सोय आपले सरकार सेवा केंद्र, बॅंका, स्वस्त धान्य दुकानामध्ये करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारीला पोर्टलवर याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर या गावनिहाय याद्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गावात चावडीवर लावण्यात येतील. जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय समिती गठित करतील.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com