जळगाव जिल्ह्यात कर्जमाफीच्या याद्या जाहीर; प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू

जळगाव जिल्ह्यात कर्जमाफीच्या याद्या जाहीर; प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू
जळगाव जिल्ह्यात कर्जमाफीच्या याद्या जाहीर; प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू

जळगाव ः महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शनिवारी (ता. २९) जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ८३२ शेतकऱ्यांची यादी जाहीर केली. सोमवारपासून (ता. २) जिल्ह्यात सर्वत्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ३ हजार ६५७ केंद्रांवर पडताळणी होणार आहे.  एप्रिल २०१५ ते मार्च २०१९ केलेल्या अल्पमुदत पीककर्जाचे, पुनर्गठन/ फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम २ लाखापर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल.  ३ हजार ६५७ केंद्रावर पडताळणी  शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात ३ हजार ६५७ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यात ग्रामपंचायतीच्या ८५१ आपले सेवा केंद्र, महसूल विभागाचे सीएससी सेंटर ग्रामीण भागात ५४५ व शहरी भागातील ३२०, रेशन दुकाने १९४१ यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर पडताळणी करता येईल. मात्र, त्यांचे त्या यादीत असायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com