जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप सामना 

काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये जाण्यास नकार दिल्याने जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलचा फज्जा उडाला. यातच भाजपनेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप सामना  In Jalgaon District Bank BJP match against Mavia
जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप सामना  In Jalgaon District Bank BJP match against Mavia

जळगाव : काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये जाण्यास नकार दिल्याने जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलचा फज्जा उडाला. यातच भाजपनेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. कोअर कमिटीच्या रविवारी (ता.१७) सायंकाळी झालेल्या बैठकीत भाजप नेत्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. भाजपकडून सर्व २१ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचेही ठरले, अशी माहिती भाजप नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या बैठकीनंतर दिली.  जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी रविवारी सायंकाळी अजिंठा शासकीय विश्रामगृहात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटील, रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन आदी उपस्थित होते. 

महाजन मविआवर बरसले  जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार आहे. भाजपकडून सर्वच्या सर्व २१ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला आहे. असे असताना आम्हाला गाफील ठेऊन इतर पक्षांची खलबते सुरू होती, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला व महाविकास आघाडीबाबत नाराजी व्यक्त केली.  गिरीश महाजन यांनी काँग्रेसवर थेट टीका केली. महाजन म्हणाले, ‘‘काँग्रेसने सर्वपक्षीय पॅनेल संदर्भात आयोजित केलेल्या सुरुवातीच्या ३ बैठकांना हजेरी लावली. पण नंतर मात्र, भाजप जातीयवादी पक्ष असल्याचे सांगून त्यांनी ऐनवेळी भूमिका बदलली. काँग्रेस सोयीचे राजकारण करीत आहे. बँकेच्या निवडणुकीसंबंधी अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. पक्षातील वरिष्ठांनी निवडणूक लढण्याच्या सूचना दिल्या आहेत. पदाधिकाऱ्यांना त्याबाबत अवगत केले.’’ 

भाजपचे खासदार, आमदार निवडणूक लढणार  पक्षनेतृत्त्वाच्या आदेशानुसार भाजपने या निवडणुकीत दिग्गजांना उतरविण्याचे निश्चित केल्याचे दिसत आहे. माजी मंत्री तथा जामनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार गिरीश महाजन स्वतः जामनेर तालुका सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी करणार आहेत. तसेच भाजपचे दोन्ही खासदार म्हणजेच रक्षा खडसे व उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ हेदेखील जिल्हा बँकेची निवडणूक लढतील, असे स्पष्ट झाले आहे. दिग्गज एकमेकांविरोधात उभे ठाकणार असल्याने निवडणुकीत रंग भरेल, असे दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com