Agriculture News in Marathi In Jalgaon District Bank BJP match against Mavia | Page 2 ||| Agrowon

जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप सामना 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये जाण्यास नकार दिल्याने जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलचा फज्जा उडाला. यातच भाजपनेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव : काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये जाण्यास नकार दिल्याने जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलचा फज्जा उडाला. यातच भाजपनेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. कोअर कमिटीच्या रविवारी (ता.१७) सायंकाळी झालेल्या बैठकीत भाजप नेत्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. भाजपकडून सर्व २१ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचेही ठरले, अशी माहिती भाजप नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या बैठकीनंतर दिली. 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी रविवारी सायंकाळी अजिंठा शासकीय विश्रामगृहात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटील, रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन आदी उपस्थित होते. 

महाजन मविआवर बरसले 
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार आहे. भाजपकडून सर्वच्या सर्व २१ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला आहे. असे असताना आम्हाला गाफील ठेऊन इतर पक्षांची खलबते सुरू होती, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला व महाविकास आघाडीबाबत नाराजी व्यक्त केली. 
गिरीश महाजन यांनी काँग्रेसवर थेट टीका केली. महाजन म्हणाले, ‘‘काँग्रेसने सर्वपक्षीय पॅनेल संदर्भात आयोजित केलेल्या सुरुवातीच्या ३ बैठकांना हजेरी लावली. पण नंतर मात्र, भाजप जातीयवादी पक्ष असल्याचे सांगून त्यांनी ऐनवेळी भूमिका बदलली. काँग्रेस सोयीचे राजकारण करीत आहे. बँकेच्या निवडणुकीसंबंधी अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. पक्षातील वरिष्ठांनी निवडणूक लढण्याच्या सूचना दिल्या आहेत. पदाधिकाऱ्यांना त्याबाबत अवगत केले.’’ 

भाजपचे खासदार, आमदार निवडणूक लढणार 
पक्षनेतृत्त्वाच्या आदेशानुसार भाजपने या निवडणुकीत दिग्गजांना उतरविण्याचे निश्चित केल्याचे दिसत आहे. माजी मंत्री तथा जामनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार गिरीश महाजन स्वतः जामनेर तालुका सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी करणार आहेत. तसेच भाजपचे दोन्ही खासदार म्हणजेच रक्षा खडसे व उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ हेदेखील जिल्हा बँकेची निवडणूक लढतील, असे स्पष्ट झाले आहे. दिग्गज एकमेकांविरोधात उभे ठाकणार असल्याने निवडणुकीत रंग भरेल, असे दिसत आहे.


इतर बातम्या
मेळघाटच्या स्ट्रॉबेरीची पर्यटकांना भुरळचिखलदरा, जि. अमरावती : महाबळेश्वरच्या धर्तीवर...
नागपूर जिल्ह्यात एक कोटी ६३ लाखांचा...नागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने...
शेतजमिनीची कर्जे माफ करा;...कुरुंदवाड, जि. कोल्हापूर ः कर्मवीर दादासाहेब...
सांगली बाजार समितीला पुन्हा मिळाली...सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह सात...
अकोल्याचा सर्वसाधारण योजना नियतव्यय २००...अकोलाः जिल्ह्याच्या २०२२-२३ च्या सर्वसाधारण...
जवान अन् किसान देशाचे आधारस्तंभ:छगन...नाशिक: सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसेच...
नाशिक: श्रमदान, लोकसहभागातून तीन दुर्गम...नाशिक: जिल्ह्याच्या पश्चिम भागातील आदिवासी...
यावल/फैजपूर, जि.जळगाव : हवामानमापक...यावल/फैजपूर, जि.जळगाव : तालुक्यात डिसेंबरमध्ये...
मंगळवेढ्यात मका खरेदी केंद्र सुरु, ...सोलापूर ः मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ...
जळगाव ः बोगस पशुवैद्यकांची यादी...जळगाव ः जिल्ह्यात बोगस डॉक्टर, बोगस पॅथॅलॉजी लॅब...
Top 5 News: रशिया-युक्रेन संघर्षाचा...1. सध्या पंजाबपासून झारखंडपर्यंत हवेचा कमी दाबाचा...
मोहरीच्या वायदेवापसीची मागणी का होतेय?वायदेबंदीला विरोध वाढतो आहे. मोहरीचे वायदे पुन्हा...
देशाची मोहरी क्रांतीकडे वाटचालपुणेः खाद्यतेल आणि पेंडच्या दरातील तेजीमुळे...
उत्तर भारतात मोहरी,हरभऱ्याला अवकाळीचा...अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उत्तर भारतातील...
रब्बी पेरणीत मक्याचे वर्चस्ववृत्तसेवा - चालू रब्बी हंगामात (Rabbi Season...
कृषी ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारचे...  कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या (drone )...
यंदाच्या हंगामात इथेनॉलचा पुरवठा...वृत्तसेवा - इंधनाच्या आयातीवरील (Fuel Import)...
मस्त्यव्यावसायिकांनी शास्त्रशुद्ध...मस्त्यव्यवसाय क्षेत्राने देशांतर्गत गरजा...
भारत ठरला काकडीचा सर्वात मोठा...पुणे - भारत जगात काकडीची (Cucumber) निर्यात (...
किमान तापमानात घट शक्य पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...