जळगाव : महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्‍चित

जळगाव जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले असून राष्ट्रवादी ११, शिवसेना ७, काँग्रेस ३ जागा लढणार आहेत.
जळगाव : महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्‍चित
जळगाव : महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्‍चित

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले असून राष्ट्रवादी ११, शिवसेना ७, काँग्रेस ३ जागा लढणार आहेत. तरीही महिला राखीवमधून एका जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. त्याबाबत बदल होण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी शनिवारी (ता. ६) शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी जागा वाटपावर चर्चा झाली. चोपडा येथील जागा काँग्रेस पक्षाला देण्यात आली. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ११ जागा देण्यात आल्या आहेत, तर शिवसेनेला ७ आणि काँग्रेसला तीन जागा देण्यात आल्या आहेत.

काँग्रेसची चार जागेची मागणी : काँगेस पक्षाला तीन जागा देण्यात आल्या असल्या तरी त्यांनी आणखी एका जागेची मागणी केली आहे. महिला राखीवमधून त्यांनी धरणगाव येथील काँग्रेस नेते डी. जी. पाटील यांच्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अमळनेर येथील तिलोत्तमा पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी अडून आहेत. काँगेसला सद्या यावल, रावेर व चोपडा या तीन विकास सोसायटीच्या जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादीला मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर, धरणगाव, चाळीसगाव या चार विकास सोसायटीच्या जागा मिळाल्या आहेत. शिवसेनाला जळगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा या चार विकास सोसायटीच्या जागा मिळाल्या आहेत. तर सहा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसी, इतर संस्था व महिला राखीव या जागा देण्यात आल्या आहेत. एसटी आणि व्हीजेएनटीची जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. या बैठकीत शिवसेनेतर्फे आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीतर्फे डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, काँग्रेसतर्फे प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com