agriculture news in marathi Jalgaon District Cooperative bank | Agrowon

खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र आणण्याचे प्रयत्न

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन दोघांना एकत्र आणून बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील मध्यस्थी करणार आहेत.

जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचा वाद सर्वश्रुत आहे, मात्र जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत दोघांना एकत्र आणून बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, यासाठी शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील मध्यस्थी करणार आहेत. त्यांची सफल होणार काय याकडेच आता लक्ष आहे.

भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन हे एकमेकांविरुद्ध आक्रमक झाले आहेत. दोघे टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांचा वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाला आहे. मात्र आता जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी सुरू आहे.

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तीन पक्ष महाविकास आघडी म्हणून एकत्र आहेत. मात्र भारतीय जनता पक्ष सोबत येणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेत खडसे यांचे वर्चस्व आहे. गेल्या वेळी निवडणुका झाल्या त्या वेळी ते भारतीय जनता पक्षात होते. आता ते राष्ट्रवादीत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे पक्षाकडून तेच जळगाव जिल्ह्यात निर्णय घेतील. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाजन यांचीही सहमती असणे आवश्यक आहे.

बिनविरोध निवडणुकीसाठी आता भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मुंबईत डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, तसेच शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार व जिल्हा बँक संचालक चिमणराव पाटील, भाजप आमदार व जिल्हा बँक संचालक संजय सावकारे, शिवसेना आमदार व जिल्हा बँक उपाध्यक्ष किशोर पाटील यांनी भेट घेतली. भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांचीही भेट घेण्यात येत आहे, त्यासाठी शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. महाजन आता खडसेंसोबत एकत्र येण्यास तयार होणार का, हाच प्रश्‍न आहे. भारतीय जनता पक्ष सहकार क्षेत्रात फारसे लक्ष देत नव्हता, मात्र आता केंद्रात सहकार मंत्रिपद निर्माण केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
शेततळ्याच्या अनुदानासाठी नगरला सर्वाधिक...नगर ः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या...
कृषिपंपांची वीजतोडणी मोहीम तत्काळ...हिंगणा, जि. नागपूर : महावितरण कंपनीने कृषिपंपाचे...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत...जलालखेडा, जि. नागपूर : खरीप हंगाम सन २०२१-२२ ला...
अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग,...नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास...नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण...
कृषिमंत्र्यांच्या तालुक्याची अतिवृष्टी...नाशिक: जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान...
यवतमाळ : पाणंद रस्त्यांची मोहीम अर्धवटयवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाणंद रस्ते अतिशय...
सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या...सोलापूर ः जिल्ह्याच्या विविध भागांतील...
सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ...सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी २०...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोंडलेचा १७० कोटींचा निवाडा मंजूरचिमठाणे, जि. धुळे : शिंदखेडा व धुळे तालुक्यांना...
जळगाव जिल्ह्यात भरडधान्य खरेदी योजनेचा...जळगाव ः जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना...
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज...नाशिक : निफाड तालुक्यात मका व सोयाबीन काढणीचे काम...
मेशी येथे आधारभूत खरेदी किंमतकडे...मेशी, ता. देवळा : आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत...
गावकऱ्यांच्या श्रमामुळे ‘पद्मश्री’ :...नगर : ‘‘राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर...
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला...बुलडाणा : कापूस-सोयाबीन उत्पादकांचे प्रश्‍न,...
बारावीच्या परीक्षेसाठी आजपासून अर्ज...मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च...
जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले बर्लिन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत...
मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २...मुंबई : बुधवारच्या तुलनेत मुंबईत कोविड बाधित...
चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर...चेन्नई ः तमिळनाडूवर अतिवृष्टीचे संकट घोंघावू...