Agriculture news in marathi Jalgaon district farmers get enough funds? | Agrowon

जळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत नाही?

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी जिल्ह्याला १७९ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. मागणीच्या तुलनेत फक्त २८ टक्केच निधी प्राप्त झाल्याने सर्वच नुकसानग्रस्तांना लागलीच मदत मिळणार नसल्याची स्थिती आहे. लवकरच या निधीचे तालुकानिहाय शेतकऱ्यांना वाटप होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

यातच अतिवृष्टीसंबंधीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती किंवा पथक शुक्रवारी (ता. २२) धुळ्यात दाखल होत असून, शनिवारी (ता. २३) ही समिती जळगाव जिल्ह्यात पाहणी करणार आहे. 

जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी जिल्ह्याला १७९ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. मागणीच्या तुलनेत फक्त २८ टक्केच निधी प्राप्त झाल्याने सर्वच नुकसानग्रस्तांना लागलीच मदत मिळणार नसल्याची स्थिती आहे. लवकरच या निधीचे तालुकानिहाय शेतकऱ्यांना वाटप होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

यातच अतिवृष्टीसंबंधीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती किंवा पथक शुक्रवारी (ता. २२) धुळ्यात दाखल होत असून, शनिवारी (ता. २३) ही समिती जळगाव जिल्ह्यात पाहणी करणार आहे. 

जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सहा लाख ४१ हजार ३४५ शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार ३२३ रुपयांची मदत मिळावी, असा प्रस्ताव राज्य सचिवांना सादर केला होता. त्यापैकी एकूण निधीच्या २८ टक्के म्हणजे १७९ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. 

ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सर्वच तालुक्‍यांतील पिकांना मोठा फटका बसला. कपाशीसह ज्वारी, बाजरी, मका, कांदा, केळी या पिकांचे अतोनात नुकसान झाले. पाऊस आल्याने कपाशीची बोंडे जळाली. ज्वारी काळी पडली. मका व अन्य पिके काढून ठेवल्यानंतर अतिवृष्टी झाली. परिणामी त्यावर बुरशी आली. यामुळे कपाशीचा दर्जा खालावला. नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशा मागणीचा प्रस्ताव देण्यात आला होता. 

केंद्रीय समिती करणार धुळे, जळगावात पाहणी

ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय  समिती शनिवारी (ता. २३) जिल्ह्यात पाहणी दौरा करणार आहे. ही समिती शुक्रवारी (ता. २२) धुळे येथे पाहणी करेल. तेथे पाहणी झाल्यानंतर ही समिती शुक्रवारी सायंकाळी अंमळनेर, भडगाव, पारोळामार्गे जळगाव जिल्ह्यात येईल. या मार्गावरील गावांमधील शिवारात समिती पाहणी करेल. शनिवारी सकाळपासून भुसावळ, जामनेरला पाहणी होईल. 

असा होणार तालुकानिहाय निधीवाटप (रुपयांत) 

जळगाव    १२ कोटी ८४ लाख ५७ हजार ५२३ रुपये
भुसावळ ५ कोटी १२ लाख ५६ हजार ४९३ रुपये 
बोदवड  ५ कोटी ८० लाख ४९ हजार ४०४ रुपये
यावल ९ कोटी ७८ लाख ७७ हजार २४८ रुपये
रावेर ७ कोटी ४० लाख २९ हजार २४५ रुपये 
मुक्ताईनगर ७ कोटी २१ लाख ४ हजार २०३ रुपये
अमळनेर १० कोटी ३२ लाख ६९ हजार ४३ रुपये
चोपडा १६ कोटी ९५ लाख ५२ हजार २८७ रुपये 
एरंडोल ११ कोटी २७ लाख ५७ हजार ९०२ रुपये
धरणगाव ९ कोटी ४६ हजार २८ हजार ६३३ रुपये 
पारोळा १२ कोटी १ लाख ९० हजार ७९६ रुपये 
चाळीसगाव २१ कोटी ५ लाख १७ हजार ८०३ रुपये 
जामनेर  २३ कोटी ४१लाख ८४ हजार ७१० रुपये
पाचोरा  १५ कोटी ५ लाख २५ हजार ५४० रुपये
भडगाव  १२ कोटी २४ लाख ४० हजार १७१ रुपये 
एकूण  १७९ कोटी ९८ लाख १ हजार रुपये 

 


इतर ताज्या घडामोडी
मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरचमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१...
केंद्राने कांदा साठवणूक मर्यादा ५०...नाशिक : गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस...
१ डॉक्‍टर अन्‌ १६ हजार जनावरे !इस्लामपूर, जि. सांगली : वाळवा तालुक्‍यात राज्य...
एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून...नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक...
रत्नागिरीत वाऱ्यांसह ढगाळ वातावरण;...रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
पाणी शुद्धीकरणासाठी नॅनो...अधिक पाण्यावर गाळण यंत्रणा या तुलनेने सावकाश आणि...
ढगाळ हवामानामुळे फळबाग उत्पादक धास्तावलेपुणे ः आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने...
परभणी : दोन हजारांवर शेतकऱ्यांना...परभणी  : मुख्यमंत्री सौर कृषिपंप...
औरंगाबाद विभागात १६ कारखान्यांना गाळप...औरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील १९ साखर...
बदलत्या हवामानामुळे पिकांवरील परिणामाचा...सोलापूर ः सातत्याने बदलणारे हवामान आणि त्याचा...
पुणे जिल्ह्यात कांदा रोपांच्या दरात वाढपुणे  ः वाढलेल्या कांदा दरामुळे पुणे...
मधुक्रांती प्रदर्शनास उद्यापासून प्रारंभनाशिक  : मधमाशीपालन या विषयावरील ‘मधुक्रांती...
गायी, म्हशींचे कृत्रिम रेतन करताना...पुणे  : गाय, म्हशीला कृत्रिम रेतन करताना...
कलम केलेल्या द्राक्ष बागेमध्ये करावयाची...द्राक्ष बागेमध्ये सध्या वाढीच्या विविध...
जामखेड पालिकेने बाजार समितीला ठोकले टाळेजामखेड, जि. नगर ः नगरपरिषदेने कृषी उत्पन्न बाजार...
सातारा जिल्ह्यात ३१ हजार क्विंटल बियाणे...सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ३५ हजार ९१२...
जळगावात भरताची वांगी १८०० ते ३५०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४...
एकात्मिक सेंद्रिय रासायनिक नियोजनाची...पन्नास वर्षांपूर्वी अन्नधान्यासाठी आयातीवर...
शेखर गायकवाड प्रभारी कृषी आयुक्तपुणे  : राज्यात ओला दुष्काळ, पीकविमा, रब्बी...
इथेनॉलनिर्मिती, मिश्रणासाठी बनवले नवे...वाहनातून होणाऱ्या कर्ब उत्सर्जनाचे प्रमाण कमी...