Agriculture news in marathi Jalgaon district has 321 nationalized bank accounts without 'Aadhaar' | Agrowon

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे ३२१ खाते ‘आधार’विना

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 जानेवारी 2020

जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली कर्जमुक्ती योजना अंमलबजावणीला अद्याप सुरुवात झालेली नाही. सहकारी बॅंकांसह राष्ट्रीयकृत बॅंकांकडून शेतकऱ्यांच्या आधार संलग्नित असलेल्या खात्यांची माहिती मागविण्यात आली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये ३२१ खाती व जिल्हा बॅंकेची ६५ खाती आधाराविना असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली कर्जमुक्ती योजना अंमलबजावणीला अद्याप सुरुवात झालेली नाही. सहकारी बॅंकांसह राष्ट्रीयकृत बॅंकांकडून शेतकऱ्यांच्या आधार संलग्नित असलेल्या खात्यांची माहिती मागविण्यात आली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये ३२१ खाती व जिल्हा बॅंकेची ६५ खाती आधाराविना असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपली कर्जखाती आधारशी संलग्नित करून माहिती पाठविल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही. यामुळे आपली खाती आधारशी संलग्न करण्यासाठी शेतकरी बॅंकांमध्ये चकरा मारीत आहेत. जळगाव जिल्हा बॅंकेने ज्यांची खाती आधारशी संलग्न नाहीत, त्या शेतकऱ्यांची यादी संबंधित विभाग कार्यालयात लावली आहे. गटसचिवांचे आंदोलन मध्यंतरी सुरू असल्याने हे काम रखडले होते. 

परंतु, नंतर हे आंदोलन मागे घेतल्यानंतर गटसचिवांनी आधारशी कर्जखाते संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेऊन संबंधित शेतकऱ्यांचे आधार क्रमांक मागवून घेतले. सध्या कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी गटसचिवांसह बॅंकांमध्ये तयार केली जात आहे. 
जिल्हा बॅंकेने जशी कार्यवाही हाती घेतली, तशी कार्यवाही मात्र राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये सुरू नाही. संबंधित बॅंकेतील कृषी अधिकाऱ्याकडे याबाबतची जबाबदारी दिली आहे. या अधिकाऱ्याकडे कामाचा भार अधिक असल्याने कामात खोडा येत आहे. आधार क्रमांक स्वीकारण्यासाठी सकाळची वेळ काही बॅंकांनी दिली आहे. ग्रामीण भागातील शाखांमध्येही अशीच स्थिती असल्याने शेतकऱ्यांना दोन ते तीनदा बॅंकेत आधार संलग्न करण्यासाठी चकरा माराव्या लागत आहेत. 


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
‘टेंभू’च्या पाण्यासाठी जास्त पंप सुरू...सांगली : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंभू उपसा...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...