जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीक कर्जवाटपात पिछाडीवर

जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी शेती, पीक कर्ज वितरण, निधीबाबत रोज नव्या घोषणा करीत आहेत; परंतु पीक कर्ज वितरणाची गती मात्र अतिशय संथ आहे. अनेक बॅंका तर पीक कर्जासंबंधी काम करायला तयार नाहीत. महिनाभर थांबा, असे शेतकऱ्यांना सांगत आहेत.
In Jalgaon district, nationalized banks lag behind in crop loan disbursement
In Jalgaon district, nationalized banks lag behind in crop loan disbursement

जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी शेती, पीक कर्ज वितरण, निधीबाबत रोज नव्या घोषणा करीत आहेत; परंतु पीक कर्ज वितरणाची गती मात्र अतिशय संथ आहे. अनेक बॅंका तर पीक कर्जासंबंधी काम करायला तयार नाहीत. महिनाभर थांबा, असे शेतकऱ्यांना सांगत आहेत. जिल्ह्यात सुमारे २८०० कोटी रुपये पीक कर्ज वितरण करायचे आहे; परंतु जूनअखेरपर्यंत फक्त ७१० कोटी पीक कर्ज वितरित झाले आहे.

कोरोनाचे कारण सांगून जळगाव शहरासह यावल, चोपडा, पाचोरा भागातील राष्ट्रीयीकृत बॅंका शेतकऱ्यांना बॅंकेत येण्यास मज्जाव करीत होत्या. एवढेच नव्हे, तर जळगाव जिल्ह्यात एका आघाडीच्या राष्ट्रीयीकृत बॅंकेची जळगाव शहरातील मुख्य कृषी शाखा कोरोना व इतर कारणांमुळे तब्बल आठवडाभर बंद होती. यामुळे नवे पीक कर्ज प्रस्ताव रखडले आहेत. पीक कर्ज वितरणाचा अघोषित बंद राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पुकारला आहे.

जिल्ह्यात फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कामकाज सुरळीत सुरू होते; परंतु ग्रामीण, राष्ट्रीयीकृत बॅंका मात्र शेती, पीक कर्जाचे नवे प्रस्ताव स्वीकारणे, या कर्जासाठी बॅंक खाते उघडणे, जुन्या माहितीमध्ये दुरुस्ती करून पीक कर्ज वाढवून देणे याची कुठलीही कामे करायला तयार नाहीत. अग्रणी बॅंकेचे अधिकारी शेतकऱ्यांच्या संपर्कात नाहीत. त्यांचे कार्यालय कुठे आहे, त्याचा पत्ता शेतकऱ्यांना माहीत नाही. अशीच स्थिती राहिल्यास जिल्ह्यात ३० टक्केही पीक कर्ज वितरण ऑगस्टअखेर होऊ शकणार नाही, अशी स्थिती आहे.

शेतकऱ्यांमध्ये संताप कोरोनाची कारणे सांगून शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील शाखांमधून परत पाठविले जाते. अग्रणी बॅंकेचे कुठलेही अधिकारी यासंदर्भात ठोस जबाबदारीने काम करायला तयार नाहीत. यामुळे जिल्ह्यात पीक कर्जाचा मोठा गोंधळ सुरू असून, शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com