जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून पावणेदोन लाख शेतकऱ्यांना होणार लाभ

जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून पावणेदोन लाख शेतकऱ्यांना होणार लाभ
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून पावणेदोन लाख शेतकऱ्यांना होणार लाभ

जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. जिल्ह्यात जिल्हा बॅंक व राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या एकूण १ लाख ७४ हजार ७४१ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यात राष्ट्रीयीकृत बॅंकांमधून केवळ २९ हजार ४२९ शेतकऱ्यांनाच फायदा होणार आहे. एकूण एक हजार ५० कोटी १२ लाख अकरा हजार रुपयांची कर्जमुक्ती होणार आहे.  राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्यासाठी महात्मा फुले कर्जमुक्तीची घोषणा केली. या अंतर्गत दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. त्या दृष्टीने लाभार्थीच्या याद्या तयार करून त्यांच्या खात्यावर ती रक्कम टाकण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अंतिम याद्या करण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यादृष्टीने राष्ट्रीयीकृत व जिल्हा बॅंकेने कामही पूर्ण केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.  जळगाव जिल्ह्यात दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचे महात्मा फुले कृषी योजनेअंतर्गत राष्ट्रीयीकृत बॅंका व जिल्हा बॅंकाचे एकूण १ लाख ७७ हजार ७४४ लाभार्थी आहेत. यात जिल्हा बॅंकेचे १ लाख ४९ हजार ७४१ लाभार्थी आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांची संख्या कमी असून, केवळ २४ हजार ४२९ शेतकऱ्यांनाच या कर्जमुक्तीचा फायदा होणार आहे.  पावणेदोन लाख शेतकऱ्यांना एक हजार पन्नास कोटी १२ लाख अकरा हजार रुपयांची कर्जमुक्ती होणार आहे. यात यात राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून साधारणतः: १४९ कोटीची तर जिल्हा सहकारी बॅंकेकडून ७४५ कोटी ४२ लाख ९९ हजाराची कर्जमुक्ती होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com