Agriculture news in marathi In Jalgaon district, two lakh farmers will get benefit from debt relief scheme | Page 2 ||| Agrowon

जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून पावणेदोन लाख शेतकऱ्यांना होणार लाभ

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. जिल्ह्यात जिल्हा बॅंक व राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या एकूण १ लाख ७४ हजार ७४१ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यात राष्ट्रीयीकृत बॅंकांमधून केवळ २९ हजार ४२९ शेतकऱ्यांनाच फायदा होणार आहे. एकूण एक हजार ५० कोटी १२ लाख अकरा हजार रुपयांची कर्जमुक्ती होणार आहे. 

जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. जिल्ह्यात जिल्हा बॅंक व राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या एकूण १ लाख ७४ हजार ७४१ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यात राष्ट्रीयीकृत बॅंकांमधून केवळ २९ हजार ४२९ शेतकऱ्यांनाच फायदा होणार आहे. एकूण एक हजार ५० कोटी १२ लाख अकरा हजार रुपयांची कर्जमुक्ती होणार आहे. 

राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्यासाठी महात्मा फुले कर्जमुक्तीची घोषणा केली. या अंतर्गत दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. त्या दृष्टीने लाभार्थीच्या याद्या तयार करून त्यांच्या खात्यावर ती रक्कम टाकण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अंतिम याद्या करण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यादृष्टीने राष्ट्रीयीकृत व जिल्हा बॅंकेने कामही पूर्ण केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. 

जळगाव जिल्ह्यात दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचे महात्मा फुले कृषी योजनेअंतर्गत राष्ट्रीयीकृत बॅंका व जिल्हा बॅंकाचे एकूण १ लाख ७७ हजार ७४४ लाभार्थी आहेत. यात जिल्हा बॅंकेचे १ लाख ४९ हजार ७४१ लाभार्थी आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांची संख्या कमी असून, केवळ २४ हजार ४२९ शेतकऱ्यांनाच या कर्जमुक्तीचा फायदा होणार आहे. 

पावणेदोन लाख शेतकऱ्यांना एक हजार पन्नास कोटी १२ लाख अकरा हजार रुपयांची कर्जमुक्ती होणार आहे. यात यात राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून साधारणतः: १४९ कोटीची तर जिल्हा सहकारी बॅंकेकडून ७४५ कोटी ४२ लाख ९९ हजाराची कर्जमुक्ती होणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...
दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा ...मुंबई: दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा...
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...