agriculture news in marathi, In Jalgaon, fast wheat flour | Agrowon

जळगावात गहू मळणीला वेग

टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 एप्रिल 2019

गणपूर, जि. जळगाव : जिल्ह्यात गहू मळणी वेगात सुरू आहे. या हंगामात सुमारे शंभरावर मळणी यंत्रचालक, ट्रॅक्‍टरचलित यंत्रधारकांना रोजगारही मिळाला आहे. रोज सुमारे पाचशे एकर गव्हाची मळणी सुरू असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बाजार समित्यांसह खेडा खरेदीलाही वेग आला आहे. बऱ्यापैकी उलाढाल होत असल्याची माहिती आहे. 

मळणीसाठी तमिळनाडू, महाराष्ट्र व पंजाबमधील हार्वेस्टर दाखल झाले आहेत. प्रतिएकर १२०० रुपये, असे दर ते घेत आहेत. तर ट्रॅक्‍टरचालक २५० रुपये प्रतिक्विंटल, या दरात मळणी करून देत आहेत. पुढील पाच ते सात दिवसांमध्ये जिल्हाभरात गव्हाची मळणी पूर्ण होईल, अशी स्थिती आहे.  

गेल्या पंधरा दिवसांपासून विविध भागांतील शिवारांमध्ये गहू मळणी वेगात सुरू आहे. धुळ्यातील शिरपूर, जळगाव जिल्ह्यांतील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव, पाचोरा भागात पेरणी बऱ्यापैकी झाली होती. घरापर्यंत गहू आणण्यासाठी ट्रॅक्‍टर मालक पाचशे ते सहाशे रुपये भाडे घेतात. 

लोकवन गव्हाची खरेदी गावोगावी जाऊन व्यापारी करीत आहेत. शिरपूर, इंदूर (मध्य प्रदेश), जळगाव भागातील खरेदीदार गव्हाची खेडा खरेदी करीत आहेत. जागेवरच १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर लोकवन गव्हाला मिळत आहे. जळगाव, अमळनेर, चोपडा, पाचोरा, शिरपूर, दोंडाईचा (जि. धुळे) येथील बाजारात गव्हाची आवक स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

इतर बातम्या
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे  अरबी समुद्रातून होत असलेला...
मुंबईसह, कोकणात दमदार पाऊसपुणे : कोकण किनारपट्टीलगतच्या समुद्रात...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
पीकविम्याच्या साइटवरून चार गावांची...बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यातील काही गावांतील...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
राज्यातील शिल्लक कापसाविषयी संभ्रम नागपूरः राज्यात कापसाच्या शिल्लक साठ्याविषयी...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
पुणे जिल्हा परिषदेची ‘हर घर गोठे- घर घर...पुणे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
टाळेबंदीतही कारखान्यांकडून ९७ टक्के...कोल्हापूर: टाळेबंदीच्या संकटामध्येही यंदा...
पंचनाम्याची प्रक्रिया संशयास्पद :...पुणे: राज्यातील सोयाबीन बियाणे उगवणीबाबत...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...