मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
जळगावच्या सुवर्ण बाजाराला झळाळी
शुद्धता, सचोटीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्ण बाजाराला दिवाळीनिमित्त झळाली आली आहे.
जळगाव ः शुद्धता, सचोटीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्ण बाजाराला दिवाळीनिमित्त झळाली आली आहे. वसुबारस, धनत्रयोदशीला खरेदीबाबत कोरोना काळातही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला.
धनत्रयोदशीला अनेक जण सोने खरेदीचा मुहूर्त साधतात. जळगावचा सुवर्ण बाजार राज्यभरात प्रसिद्ध आहे. राज्यात प्रसिद्ध सोन्याचे विक्रेते जळगावात आहेत. जिल्ह्यातून परराज्यांत, मुंबई, पुणे व इतर भागांत नोकरी, व्यवसायानिमित्त गेलेली मंडळी दिवाळीला जळगावातून सोन्याची खरेदी करतात. शिवाय केळी, कापसाच्या भागांतील मंडळीदेखील चांगले उत्पादन आल्यास सोन्याची खरेदी करतात.
मध्य प्रदेश, नजीकच्या विदर्भातील बुलडाणा, मराठवाड्यातील औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड, जालना आदी भागांतील खरेदीदारही जळगावात सोने खरेदीसाठी येतात. यामुळे यंदा कापूस, केळीला कोरोना काळाचा व नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी फारशी उत्साहात नाही.
सोन्याचे दर ५१ हजार रुपये प्रतितोळ्यापेक्षा अधिक होते. परंतु त्यात घट झाली. एनसीएक्सनुसार ५० हजार ७०८ रुपये प्रतितोळा, असे दर झाले. तर जळगावात ५१ हजार रुपये प्रतितोळा असे दर होते. वसुबारस व धनत्रयोदशीला मिळून सुमारे सात कोटींची उलाढाल बाजारात झाली. या दिवाळीनिमित्त उलाढाल सुमारे २० ते २२ कोटींची होईल, असा अंदाज आहे.
जळगावात सुमारे चार हजार परप्रांतीय सुवर्ण कारागीर आहेत. तर प्रमुख पाच संस्थांच्या सुवर्णपेढ्या आहेत. लहान-मोठी मिळून सुमारे ७५ सोने-चांदीची दुकाने सराफ बाजारात आहेत. यंदा उलाढाल कमी होईल, असे चित्र सुरुवातीला होते.
- 1 of 1022
- ››