जळगावात गवार २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

In Jalgaon, guar is available at Rs 2000 to 4000 per quintal
In Jalgaon, guar is available at Rs 2000 to 4000 per quintal

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १) गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. तिला दर प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये मिळाला. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत. 

बाजारात शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ३२ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ११०० ते १८०० रुपये दर मिळाला. भरीताच्या वांग्यांची २७ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १००० ते १७०० रुपयांपर्यंत मिळाले. आल्याची २० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये दर मिळाला. बटाट्याची २४० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२५० ते १९०० रुपये दर होता.  ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

भेंडीची २० क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १००० ते १६०० रुपये मिळाला. टोमॅटोची १२ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १३०० ते १८०० रुपये मिळाला. कोबीची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये मिळाला. काटेरी, लहान वांग्यांची २४ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची नऊ क्विंटल आवक झाली. ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची आठ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर होता. 

डाळिंबांची २१ क्विंटल आवक

डाळिंबांची २१ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ५२०० रुपये दर मिळाला. बीटची सहा क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १६०० ते २४०० रुपये दर मिळाला. लिंबांची पाच क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर होता. पालकाची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. गाजराची आठ क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल ११०० ते २००० रुपये दर मिळाला, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com