जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटल

जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटल
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २०) गवारीची दोन क्विंटल आवक झाली. कूस असलेल्या गवारीला चांगला उठाव मिळाला. गवारीला प्रतिक्विंटल ४६०० रुपये दर मिळाला. संकरित प्रकारच्या गवारीला २५०० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. आवक जामनेर, पाचोरा, यावल आदी भागांतून होत आहे. 

बाजारात कोथिंबिरीची आठ क्विंटल आवक झाली. दर १८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बिटची पाच क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १८०० रुपये दर मिळाला. डाळिंबाची ३० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १९०० ते ४६०० रुपये दर मिळाला. लिंबांची सहा क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १८५० ते २५०० रुपये दर होता. शेवग्याची दोन क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १८०० ते २४०० रुपये दर मिळाला. आल्याची ३५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ५१०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचिची ३५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १८०० ते २६०० रुपये दर मिळाला. 

बटाट्याची ३०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७५० ते १०५० रुपये दर होता. भेंडीची ११ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १५०० ते २१०० रुपये मिळाला. गंगाफळाची २५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये होता. कोबीची १७ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १५०० ते २६०० रुपये मिळाला. गाजराची १२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते ११०० रुपये दर मिळाला. लाल कांद्याची ८०० क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल ५५० ते १५५० रुपये होता. 

पालकाची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. कारल्याची दोन क्विंटल आवक झाली. कमाल दर प्रतिक्विंटल २५०० रुपये मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २४०० ते ४००० रुपये दर होता. टोमॅटोची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com