मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
बाजारभाव बातम्या
जळगाव बाजार समितीती कांदा दरात सुधारणा
जळगाव ः लाल कांद्याची आवक अस्थिर असून, दरात मागील दोन दिवसांत काहीशी सुधारणा झाली असून, शुक्रवारी (ता. २५) जळगाव बाजार समितीत दर्जेदार कांद्यास प्रतिमण ४०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले.
किमान दर २०० रुपये प्रतिमण असे होते. लहान व बेढब आकाराच्या कांद्याचीदेखील आवक होत असून, त्यास प्रतिमण १९० रुपये दर मिळाल्याची माहिती मिळाली. कांद्याची या आठवड्यात शुक्रवारपर्यंत आवक कमी अधिक झाली. सरासरी १००० क्विंटल आवक झाली. दोन दिवस फक्त ६०० क्विंटल आवक झाली होती. आवक सध्या धुळे, पाचोरा, जळगाव, यावल, भुसावळ भागांतून होत आहे.

कांद्याचे दर या आठवड्याच्या सुरवातीला प्रतिमण किमान १८० व कमाल ३२५ रुपयांपर्यंत होते. परंतु जशी आवक कमी झाली, तशी दरात काहीशी सुधारणा झाली. लाल कांद्याची काढणी खानदेशात अपवाद वगळता आटोपली आहे. यातील कमाल शेतकऱ्यांनी बाजारात कांद्याची विक्री केली आहे. फारसा कांदा शेतकऱ्यांकडे किंवा शिवारात साठविलेला नाही. यामुळे पुढे लाल कांद्याची आवक कमी होईल. पांढऱ्या कांद्याची नगण्य आवक जळगाव बाजार समितीत झाली. दोन दिवस पांढऱ्या कांद्याची आवक झालीच नाही. आवक प्रतिदिन सरासरी ८० क्विंटलपर्यंत झाल्याची माहिती मिळाली.
किनगाव, अडावद, चाळीसगावच्या बाजारातही कमी आवक
किनगाव (ता. यावल), अडावद (ता. चोपडा) व चाळीसगाव येथील बाजारातही लाल कांद्याची आवक मागील हंगामाच्या तुलनेत निम्म्याने घटली आहे. परंतु, तेथेही दरात फारशी वाढ झालेली नाही. तेथेही २०० ते ३२५ रुपये प्रतिमणपर्यंतचे दर कांद्याला मिळाल्याची माहिती मिळाली.