agriculture news in marathi, Jalgaon market committee stoped for four days | Agrowon

जळगाव बाजार समिती चार दिवसांपासून ठप्प
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

जळगाव  : सोशल मीडियासह इतर माध्यमांद्वारे सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दरात मालाची खरेदी केल्यास दंड व शिक्षेची तरतूद असण्याचे वृत्त पसरल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. त्यांनी आणलेला माल व्यापारी खरेदी करीत नसल्याने चार दिवसांपासून बाजार समितीत व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. या संदर्भात कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वत: तसे परिपत्रक नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजार समितीत आणावा. तो खरेदी केला जाईल.

जळगाव  : सोशल मीडियासह इतर माध्यमांद्वारे सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दरात मालाची खरेदी केल्यास दंड व शिक्षेची तरतूद असण्याचे वृत्त पसरल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. त्यांनी आणलेला माल व्यापारी खरेदी करीत नसल्याने चार दिवसांपासून बाजार समितीत व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. या संदर्भात कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वत: तसे परिपत्रक नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजार समितीत आणावा. तो खरेदी केला जाईल. या संदर्भात कोणतीही अडचण आल्यास सभापती अथवा बाजार समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील यांनी केले
आहे.

 ‘‘सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दरात मालाची खरेदी केल्यास दंड व शिक्षेची तरतूद असण्याच्या वृत्ताने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, असे कोणतेही परिपत्रक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल बाजार समितीत आणावा. तो खरेदी केला जाईल, व्यापाऱ्यांनीही तो खरेदी करावा,’’ असे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.

गावागावांत खरेदी केंद्र हवे

सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाच्या तुलनेत बाजारातील भाव कमी असल्याने व्यापारी हमीभावात माल कसा खरेदी करणार, असा सवाल पाटील यांनी केला. एकीकडे सरकार हमीभाव जाहीर करते व त्यापेक्षा सरकार खरेदी करणाऱ्या मालाची कमी दराने निविदा काढते. यामुळे कोणता व्यापारी माल खरेदी करेल, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासाठी सरकारने केवळ तालुक्‍याच्या ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र न ठेवता प्रत्येक गावात खरेदी केंद्र सुरू करून हमीभावात माल खरेदी करावा अथवा मध्य प्रदेश सरकारप्रमाणे भावांतर योजनेअंतर्गत फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी केली.

इतर ताज्या घडामोडी
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...
नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...
धक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर  ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...
अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...
नाशिक जिल्ह्यात नुकसानीपोटी १८१ कोटींची...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांना...
नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला गेले तडे ! ५०...नाशिक  : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यामुळे...
...'या' सिंचन योजनेची पाणीपट्टी होणार...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीची...
किसान सभेकडून विमा कंपनीला २८...पुणे : पुण्यातील दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून...
हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत...आळंदी, जि. पुणे  ः टाळ-मृदंगाचा निनाद आणि...
गूळ सौदे सुरू करण्यासाठी दोन्ही घटकांना...कोल्हापूर  : गेल्या दोन दिवसांपासून व्यापारी...
सांगली जिल्ह्यात ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी...सांगली : जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होताच...
कोल्हापुरात कारखान्यांकडून ऊसतोड सुरू...कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून...
जळगावात भरताची वांगी १५०० ते २६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...