Agriculture news in Marathi, In Jalgaon, rates of guar, BlackeyeBean and fenugreek survive | Agrowon

जळगावात गवार, चवळी, मेथीचे दर टिकून

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात गवार, चवळी व मेथीचे दर टिकून राहिले. मेथीला कमाल साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर गवारीला कमाल ४५०० आणि चवळीला २८०० रुपये प्रतिक्विंटलचा कमाल दर राहिला.

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात गवार, चवळी व मेथीचे दर टिकून राहिले. मेथीला कमाल साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर गवारीला कमाल ४५०० आणि चवळीला २८०० रुपये प्रतिक्विंटलचा कमाल दर राहिला.

टोमॅटो, भेंडीच्या दरात गेल्या आठवड्यात काहीशी घसरण झाली. भेंडीची आवक धरणगाव, एरंडोल, जामनेर भागांतून होत आहे. दर प्रतिक्विंटल १४०० ते २२०० रुपयांपर्यंत मिळाला. आवक प्रतिदिन १६ क्विंटल झाली. टोमॅटोची स्थानिक भागातील आवक सुरू झाली आहे. धुळ्यासह नाशिकमधील सटाणा, मालेगाव, जळगाव जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल, औरंगाबादमधील सिल्लोड, सोयगाव येथून टोमॅटोची आवक होत आहे. दरात क्विंटलमागे सुमारे २०० ते २५० रुपयांची घसरण झाली.  टोमॅटोला प्रतिक्विंटल १००० ते १६५० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. आवक प्रतिदिन १७ क्विंटलपर्यंत झाली. चवळीची प्रतिदिन साडेतीन क्विंटल आवक झाली. आवक पाचोरा, जामनेर, भुसावळ, यावल, चोपडा भागांतून होत आहे. दर किमान १८०० व कमाल २८०० रुपये प्रतिक्विंटलचा मिळाला. 

गवारीची प्रतिदिन अडीच क्विंटल आवक झाली. कूस असलेल्या गवारीची अधिकची आवक राहिली. गवारीला प्रतिक्विंटल किमान २६०० व कमाल ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. गवारीची आवक जामनेर, पाचोरा, एरंडोल या भागांतून होत आहे. मेथीची स्थानिक भागातील आवक दोन ते अडीच महिन्यांपासून रखडत सुरू आहे. मेथीचे दर टिकून असून, प्रतिक्विंटल कमाल साडेतीन हजार रुपयांचा दर मिळाला. आवक जामनेर, पाचोरा, एरंडोल, धरणगाव भागांतून होत आहे. कारल्यांच्या दरांवरही दबाव दिसून आला. गेल्या आठवड्यात कारल्यांची प्रतिदिन नऊ क्विंटल आवक झाली. कारल्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २४०० रुपयांचा दर मिळाला. आवक पाचोरा, यावल, चोपडा, भुसावळ, जळगाव आदी भागांतून होत आहे. पालक, पोकळ्याचे दर स्थिर राहिले. पोकळ्याची प्रतिदिन दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १४०० रुपयांपर्यंत मिळाले. पालकची प्रतिदिन दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १३०० रुपयांपर्यंत राहिले.
 
केळीचे दरही स्थिर
उत्तरेकडे श्रावणी सोमवार आटोपले असले तरी उत्तरेकडील दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशातून केळीची मागणी कायम आहे. रावेरात नवती केळीला प्रतिक्विंटल १४०० तर जळगाव भागात प्रतिक्विंटल १३३० रुपये दर मिळाले. दर मागील आठ-नऊ दिवसांपासून स्थिर आहेत. रावेरात पिलबाग केळीची काढणी सुरू असून, पिलबाग केळीला प्रतिक्विंटल १२८० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. रावेर, यावल, मुक्ताईनगर, जळगाव भागात मिळून केळीची प्रतिदिन ३२५ ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) आवक झाली. आवकही फारशी वाढली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
मिरज पूर्व भागाला पाणीपट्टी भरूनही पाणी...आरग, जि. सांगली ः नेहमीच दुष्काळी भागाला जीवनदायी...
लालपरीतून हापूस पोचला औरंगाबादलाराजापूर, जि. रत्नागिरी ः लॉकडाऊनमुळे आर्थिक...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक जूनपासून...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात १ जूनपासून मासेमारी बंद...
कोल्हापुरात महावितरणची वीजबिल भरणा...कोल्हापूर : गेली दोन महिने लॉकडाऊनमुळे बंद असलेली...
बाजरीची शासकीय खरेदी सुरू करा,...जळगाव : खानदेशातील बाजार समित्यांमध्ये बाजरीची...
मॉन्सूनच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजनांची...औरंगाबाद : ‘‘पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांची...
नांदेड जिल्ह्यात जागेअभावी दोन...नांदेड : जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय...
पीक विम्याची रक्कम बचत खात्यांत जमा...नाशिक : बॅंकांनी कोरोनाच्या काळात पीक...
हिंगोलीत १० हजार ८६६ शेतकऱ्यांना पीक...हिंगोली : जिल्ह्यात शुक्रवार (ता.२२) पर्यंत १०...
केंद्र सरकारच्या पॅकेजच्या निषेधार्थ...नांदेड : शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी तत्काळ...
सटाणा येथे मका खरेदी, विक्रीचे कामकाज...नाशिक : राज्य शासनातर्फे किमान आधारभूत किंमत...
उस्मानाबादमध्ये हरभरा विक्रीसाठी २०...उस्मानाबाद : जिल्ह्यात हरभऱ्याच्या खरेदीसाठी सुरु...
पत संरचनेवर टाळेबंदीचे परिणाम, उपाय...मुंबई : कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी...
नाशिक : शेतकरी संघटनांच्या...नाशिक : केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे शेती आणि...
खते, बियाणे थेट बांधावर उपलब्ध करुन...अकोला ः या खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात खते,...
प्रोत्साहनात्मक अनुदान शेतकऱ्यांच्या...कोल्हापूर : प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या...
राज्यातील कापूस खरेदी पंधरा जूनपर्यंत...मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी...
दापोली : कृषिमंत्री भुसे आज साधणार...चिपळूण, जि. रत्नागिरी ः दापोली येथील डॉ....
पेठ येथे कृषी मंत्र्यांच्याहस्ते कृषी...बुलडाणा ः अकोला येथील विभागीय खरीप आढावा बैठक...
लोकसहभागातून मैराळडोह येथे पांदण...वाशीम ः सध्या लॉकडाऊन सुरू असून या फावल्या वेळेत...