Agriculture news in marathi Of Jalgaon Zilla Parishad Proposals for agricultural schemes stalled | Agrowon

जळगाव जिल्हा परिषदेच्या कृषी योजनांचे प्रस्ताव रखडले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 एप्रिल 2021

जळगाव जिल्हा परिषदेत कोरोनाची समस्या मध्यंतरी कमी झाल्यानंतर कामकाज पूर्ववत झाले. परंतु कोरोनाचे संकट वाढताच याचा फटका कामकाजाला जसा बसला आहे, तसाच फटका कृषी विभागाच्या योजनांबाबतही बसू लागला आहे. 

जळगाव : जिल्हा परिषदेत कोरोनाची समस्या मध्यंतरी कमी झाल्यानंतर कामकाज पूर्ववत झाले. परंतु कोरोनाचे संकट वाढताच याचा फटका कामकाजाला जसा बसला आहे, तसाच फटका कृषी विभागाच्या योजनांबाबतही बसू लागला आहे. 

यामुळे शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांच्या लाभासंबंधी प्रस्ताव सर्व प्रक्रिया पार पाडून सादर करूनही अनुदान प्राप्त झालेले नाही. एचडीपीई पाईप, अवजारे, बॅटरी चलित फवारणी पंप, ताडपत्री आदी योजनांचे प्रस्ताव रखडले आहेत. या योजनांसाठी निधी मंजूर होता. स्वनिधीतून निधीची तरतूद केली आहे. परंतु मध्यंतरी कोरोनाचे संकट वाढले. यामुळे कामकाज रखडत सुरू होते.

परिणामी प्रस्तावही स्वीकारण्याची प्रक्रिया बंदावस्थेत होती. यामुळे शेतकऱ्यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी ताटकळत थांबावे लागते. दिवाळीनंतर कोरोनाची समस्या काहीशी कमी झाली. कृषी योजनांसाठी पूर्वसंमती, प्रस्ताव स्वीकारण्याची कार्यवाही सुरू झाली. यानंतर शेतकऱ्यांनी प्रस्ताव देखील सादर केले. परंतु नेमके अनुदान मिळण्याची वेळ येताच पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाला.

फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. मार्चच्या मध्यात कोरोनामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे कामकाज रखडले. कारण अनेक कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले. अशातच कृषी योजनांचे प्रस्ताव परिणामी अनुदानदेखील रखडले आहे.

या योजना डीबीटी पद्धतीने राबविल्या जातात. यात प्रथम लाभार्थी शेतकऱ्याला पूर्वसंमती घेऊन अवजार किंवा संबंधित बाबीची खरेदी बाजारातून करावी लागते. त्याची बिले, सातबारा उतारा व इतर कागदपत्रांसह प्रस्ताव पंचायत समितीला सादर करावा लागतो. यात अनेक दिवस लागतात. शेतकऱ्यांचा प्रवास इतर बाबींवर खर्च होतो. प्रस्ताव सादर केला, पण अनुदान मिळत नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. कोरोनाचे कारण सांगून शेतकऱ्यांना पंचायत समितीमधून परतावून लावले जात आहे, अशी माहिती एका अर्जदार शेतकऱ्याने दिली.


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...