agriculture news in marathi, Jalgaon zilla parishad rocks on scholl benches issue | Agrowon

बाकांच्या विषयावरून जिल्हा परिषदेत अारोप-प्रत्यारोप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 मे 2018

जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बाक पुरविण्यासंबंधीची निविदा वादात अडकविण्यासाठी अधिकारीच जबाबदार आहेत. अधिकाऱ्यांनी व्यवस्थित कार्यवाही करून सर्व सदस्यांना या प्रक्रियेची नेमकी माहिती दिली असती तर ही प्रक्रिया लांबली नसती, अशी नाराजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत मंगळवारी (ता. १५) सदस्यांनी व्यक्त केली. 

जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बाक पुरविण्यासंबंधीची निविदा वादात अडकविण्यासाठी अधिकारीच जबाबदार आहेत. अधिकाऱ्यांनी व्यवस्थित कार्यवाही करून सर्व सदस्यांना या प्रक्रियेची नेमकी माहिती दिली असती तर ही प्रक्रिया लांबली नसती, अशी नाराजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत मंगळवारी (ता. १५) सदस्यांनी व्यक्त केली. 

दुपारी शिक्षण समितीचे सभापती पोपट भोळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सदस्य गजेंद्र सोनवणे, रवींद्र पाटील, प्रमिला पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बाक पुरवठ्याची निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर संबंधित निविदाधारकांनी बाकांचे नमुने पाठविले. हे नमुने शिक्षणाधिकारी कार्यालयात आले. हे नमुने आलेले असतानाही त्याची माहिती पदाधिकारी व सदस्यांना दिली नाही. हा प्रकार अधिकारी व संबंधितांनी कशासाठी केला. निविदा प्रक्रिया परस्पर राबवून, पदाधिकारी व सदस्यांना अधिकची माहिती न देता बाक पुरवठा करून घेण्याचा प्रयत्नच यामागे होता, असा दावा सदस्यांनी केला. 

ही निविदा प्रक्रिया आता पुन्हा राबवून ती अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच बाक पुरवठ्यासंबंधीची अंतिम कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती यासंदर्भात नंतर प्रशासनाने दिली. यावर कोणताही विकास कार्यक्रम, निविदा, कामे असली तर त्याची माहिती सदस्यांना द्यायला हवी, असे सदस्यांनी सांगितले. 

शिक्षकांची मुले जिल्हा परिषद शाळेतच शिकवा
सभेत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची मुले, मुली जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकवायला हवीत, असा ठराव करण्यात आला. यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. तसेच गुणात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविता येतील, असा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...