Agriculture news in marathi Jalna to become major bamboo center in the country: Patel | Page 5 ||| Agrowon

जालना बांबू लागवडीचे देशातील मोठे केंद्र बनेल : पटेल

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

जालना : ‘‘उद्योजकांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत, बांबू वापरासाठी लक्ष घातले. या पर्यावरणपूरक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनातर्फे आवश्यक ती मदत देऊ. शेतकऱ्यांसह उद्योजकांचा वाढता प्रतिसाद पाहता जालना हे बांबू लागवडीचे देशातील सर्वात मोठे केंद्र बनेल,’’ असा विश्वास महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला.

जालना : ‘‘उद्योजकांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत, बांबू वापरासाठी लक्ष घातले. या पर्यावरणपूरक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनातर्फे आवश्यक ती मदत देऊ. शेतकऱ्यांसह उद्योजकांचा वाढता प्रतिसाद पाहता जालना हे बांबू लागवडीचे देशातील सर्वात मोठे केंद्र बनेल,’’ असा विश्वास महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला.

शनिवारी (ता. १६) रात्री ८ वाजता पोलाद स्टील कंपनीत पटेल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. संतोष करपे, उद्योजक नितीन काबरा, सुनील गोयल, भरत मंत्री, कृष्णा काबरा, अतुल लड्डा, डॉ. सुयोग कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. या वेळी पोलाद स्टीलच्या रिहिटिंग फरनेसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर बांबू वापराचा प्रारंभ पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 

बॉयलरमध्ये दगडी कोळशाऐवजी पर्यावरणपूरक बांबूंचा री-रोलिंग कंपनी मालकांनी वापर करावा, असे आवाहन पटेल यांनी केले. या आवाहनाला उद्योजकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून पोलाद स्टील कंपनीच्या रिहिटिंग फरनेसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर बांबूचा वापर सुरू झाला आहे. 

एमआयडीसी आणि मोतीबाग परिसरातील १०० एकर मोकळ्या जागेवर बांबू लागवड करण्याचा विचार सुरू आहे. त्यादृष्टीने पटेल आणि उद्योजकांनी या परिसराची पाहणी केली. 

लड्डा म्हणाले, ‘‘पर्यावरण संरक्षणासाठी बांबू लागवड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. जालन्यातील उद्योजक आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या संकल्पनेला उस्फूर्त प्रतिसाद देणे सुरू केले आहे. त्यामुळे बांबूसाठी बाजारपेठ उपलब्ध होईल. बियाणे नगरीप्रमाणे बांबू सिटी म्हणून जालन्याची जागतिक ओळख बनेल, असा विश्वास आहे.’’


इतर बातम्या
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...
नगरच्या सहकारावर नागवडे, मुरकुटेंची पकडउस्मानाबाद : नगर ः जिल्ह्यात श्रीगोंदा...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणाआठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती तसेच...
सोयापेंडच्या सामान्य मागणीमुळे सोयाबीन...बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळी भोवती फिरत...
वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या बैठकीचा बार...वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal)...
जागतिक स्तरावर काजूचा पुरवठा मजबूत...पुणे - २०२२ मध्ये जागतिक स्तरावर काजूचा पुरवठा (...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
...तर गावांना मिळणार ५० लाख पुणे - भारतासह जगात गेल्या दोन वर्षांपासून...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती....
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  डॉ. एन. डी...  कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,...
विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे ...पुणेः कृषी विद्यापीठांमध्ये रोजंदारीवर लागलेल्या...