जालना जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर क्षेत्र विमासंरक्षित

 In Jalna district the area is insured on three lakh and 50 thousand hectares
In Jalna district the area is insured on three lakh and 50 thousand hectares

जालना : जिल्ह्यात यंदा पेरणी झालेल्या खरीप हंगामातील ६ लाख १५ हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी ३ लाख ८८ हजार ७१४ हेक्‍टर क्षेत्र पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत विमा संरक्षित आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख २६ हजार ४४५ हेक्‍टर आहे. यापैकी यंदाच्या खरीप हंगामात ६ लाख १५ हजार १६६ हेक्‍टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यामध्ये जालना तालुक्‍यातील ८१ हजार २१६ हेक्‍टर, बदनापूर ५९ हजार ९२६ हेक्‍टर, भोकरदन ९९ हजार ९९१ हेक्‍टर, जाफराबाद ६५ हजार ५७५ हेक्‍टर, परतूर ६७ हजार २१७ हेक्‍टर, मंठा ६१ हजार ६४१ हेक्‍टर, अंबड ९२ हजार ५७२ हेक्‍टर, तर घनसावंगी तालुक्‍यातील ८७ हजार २७ हेक्‍टरवरील पिकांचा समावेश आहे. ९६४ गावांतील या क्षेत्रापैकी ५ लाख ८२ हजार २६८ शेतकऱ्यांचे ५ लाख २६ हजार ३४१ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. 

जिल्ह्यातील १० लाख ४१ हजार २३७ शेतकऱ्यांनी ३ लाख ८८ हजार ७१४.०३ हेक्‍टर क्षेत्राचा विमा उतरविला. या क्षेत्रापैकी जवळपास पावनेदोन लाख हेक्‍टर क्षेत्र अती पावसामुळे बाधित झाल्याचे कृषी विभागाचे आकडे सांगतात.  केंद्रीय पथकाच्या दौऱ्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांच्या कार्याविषयी नाराजी व्यक्‍त केली. केंद्रस्तरावरून या प्रकरणी हस्तक्षेप करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा परतावा कसा मिळेल, ते पहावे असे शेतकऱ्यांनी पथकाला सुचविले. नुकसानग्रस्तांना विमा परतावा मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

फळपिकांच्या २५५३० हेक्‍टर क्षेत्राचा विमा 

हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३५ हजार४०२ शेतकऱ्यांनी २५ हजार ५३०.६३ हेक्‍टर फळपिकांचा विमा उतरविला आहे. या क्षेत्रात लिंबूचे ११३.५१ हेक्‍टर, मोसंबी १७ हजार ९१८.०८ हेक्‍टर, पेरू २१२.२४ हेक्‍टर, डाळींब ७२६२.७६ हेक्‍टर, तर संत्र्यांच्या १.८० हेक्‍टर क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

तालुकानिहाय विमासंरक्षित क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

जालना ५५८४०
भोकरदन ५५६४३
जाफ्राबाद २९७१४
बदनापूर ३६४४८
अंबड ६५०१९
घनसावंगी ६७०११
परतूर ४४८६७
मंठा  ३४१६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com