agriculture news in marathi, Jalpujan of 32 bandaraj on Dhule's evil river | Agrowon

धुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे जलपूजन

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018
धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी बुराई नदी बारमाही प्रवाहित करण्यासाठी नदीवर बांधण्यात येणाऱ्या ३४ बंधाऱ्यांपैकी आतापर्यंत ३२ बंधाऱ्यांचे काम पूर्णत्वास आले असून, त्यांचे जलपूजन नुकतेच राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले.
 
धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी बुराई नदी बारमाही प्रवाहित करण्यासाठी नदीवर बांधण्यात येणाऱ्या ३४ बंधाऱ्यांपैकी आतापर्यंत ३२ बंधाऱ्यांचे काम पूर्णत्वास आले असून, त्यांचे जलपूजन नुकतेच राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले.
 
 बांधाऱ्यांमुळे परिसरातील भूजल पातळी उंचावण्यास मदत होईल. तसेच, शाश्वत जलसाठ्याची निर्मिती होईल, असे सांगितले जात आहे. बुराईनदी बारमाही करण्यासाठी ३४ बंधारे बांधण्यास गेल्या एप्रिलमध्ये सुरवात झाली होती. त्यापैकी दुसाने (ता. साक्री) येथे साकारलेल्या बंधाऱ्यातील जलपूजन रावल यांनी केले. या वेळी दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने आदी उपस्थित होते.
रावल म्हणाले, ‘‘बुराईनदी बारमाही करून शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या नदीवर ३४ बंधारे बांधण्याचे नियोजन केले. गेल्या एप्रिलमध्ये बुराईनदीची पायी परिक्रमा केली होती. त्यावेळेस पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्यांचे काम पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या होत्या.
‘‘सुमारे २४०० कोटी रुपये खर्चाच्या सुलवाडे- जामफळ योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे. त्याचे लवकरच भूमिपूजन होईल. चार वर्षांत ही योजना पूर्णत्वास येईल. त्यामुळे धुळे व शिंदखेडा तालुक्‍यातील सुमारे दीड लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होईल,`` असेही रावल म्हणाले. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

इतर ताज्या घडामोडी
कापूस उत्पादकांचे शोषण थांबवा: विजय...नागपूर: देशात कापसाचे दर कमी होत असतानाच...
फवारणीनंतर १८ एकरातील कपाशीने टाकल्या...अकोला ः जिल्ह्यातील म्हातोडी येथील शेतकऱ्याने...
खडसेंच्या पक्षांतराने बदलणार राजकीय...जळगाव ः भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे...
मक्याची लॉट एंट्री न झाल्याने ‘शोले...सटाणा, जि. नाशिक: हमीभावाने खरेदी केलेल्या...
परभणी जिल्ह्यात महावितरणची ६३७...परभणी :  जिल्ह्यातील वीजचोरीला आळा...
ला निनामुळे मान्सून प्रभावितलॉकडाऊनची परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात...
तंत्रज्ञान हरभरा लागवडीचे...जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक...
शेतमालाची निर्यात वाढविण्यासाठी काम...नाशिक : ``सेंद्रिय कृषी उत्पादन कसे वाढेल....
पिकांच्या वाढीसाठी द्या शिफारशीत...प्रत्येक अन्नद्रव्याचे पिकांच्या शरीरात विशिष्ट...
परभणीत ६५३ शेतीशाळांद्वारे बांधावर...परभणी : ‘‘कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
सांगलीतील १५ साखर कारखान्यांची धुराडी...सांगली : कोरोना संकटाची तीव्रता कमी होत असतानाच...
सिंधुदुर्गाला पुन्हा पावसाने झोडपलेसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या बहुतांश भागात बुधवारी (...
पुणे विभागात अडीच लाख हेक्टरवर पिकांना...पुणे ः पिके काढणीच्या अवस्थेत असताना परतीच्या...
मका, ज्वारी, बाजरीची १ नोव्हेंबरपासून...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय बाजरी, मका व ज्वारीची...
अकोल्यातील चराई क्षेत्रावरील...अकोला ः ग्रामीण भागात प्रत्येक गावातील गुरांना...
अमरावती जिल्ह्यात ६२ टक्के पीककर्ज वाटपअमरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोलापूर जिल्ह्यात सरसकट भरपाई द्या,...सोलापूर ः ‘‘गेल्या आठवड्यात  दक्षिण...
नवरात्रीमुळे फुलांच्या दरात वाढपुणे ः नवरात्रीनिमित्त फुलांना वाढलेली मागणी...
शिरापूर बंधाऱ्यावर स्वयंचलित दारांचे...सोलापूर ः उत्तर सोलापूर तालुक्यातील शिरापूर...
खानदेशात पावसाची हजेरी, पिकांना फटकाजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. २१) दुपारी व...